प्लाॅगेथाॅन २०२० : स्वच्छता मेगा ड्राईव्ह " शनिवार दिनांक २८ डिसेंबर १९.

" प्लाॅगेथाॅन २०२० : स्वच्छता मेगा ड्राईव्ह " शनिवार दिनांक २८ डिसेंबर १९.
       पुणे शहरामध्ये ४५ मुख्य रस्ते  व ९८ ठिकाणी ,१८७ उद्याने व नदी किनारी एकाच वेळी  २८६ हून जास्त ठिकाणी  एकुण २६८ कि.मी.तसेच सर्व शाळांचे परिसरात २ कि. मी. चे प्लॅागेथाॅनचे आयोजन केले आहे.मा.महापौर यांचे संकल्पनेतून हा स्वच्छता मेगा ड्राईव्ह " स्वच्छ सर्वेक्षण २०२० " अंतर्गत घेण्यात येणार आहे.यामध्ये सर्व नगरसेवक, आमदार ,खासदार ,मोहल्ला कमिटी व ॲपेक्स कमिटीचे सदस्य,बचत गट, गणेश मंडळांचे कार्यकर्ते,सर्व मनपा कर्मचारी तसेच खाजगी शाळा,काॅलेज, राष्ट्रीय सेवा योजना चे विद्यार्थी आणि शहरात राहणारे नामांकित सेलिब्रिटींचा सहभाग असणार आहे. मनपाचे सर्व १८००० सेवक , स्वच्छचे ३५०० कचरावेचक ,जनवाणी,आदर पूनावाला , स्वच्छ भारत-स्वच्छ भारत,सारे जहाॅंसे अच्छा, जिवीत नदी,समग्र नदी व नदीवर काम करणार्या सर्व संस्था,आय टी कंपनी यांचे कर्मचारी असे मिळून २५००० पेक्षा जास्त नागरिकांचा सहभाग असणार आहे.
         प्लाॅगिंग हा शब्द ' पिक अप लिटर ' म्हणजेच कचरा उचला आणि "जाॅंगिग "म्हणजे व्यायामासाठी दौंड या दोन शब्दापासून बनला आहे. यापुर्वीही जगातील मेक्सिको मध्ये जागतिक विक्रम ४००० नागरीकांचा नोंदवला आहे तर भारतात २ आक्टोबरला १९ ला वेगवेगळ्या शहरात मिळून ११००० नागरीकांनी सहभाग दिला आहे. यामुळे पुणे शहरात हा आगळा वेगळा विक्रम  करण्याची संधी मा.महापौर श्री मुरली मोहोळ यांनी उपलब्ध करून दिली असून त्यांनी  सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
        प्रशासनाकडून मायक्रो प्लॅनिंग केले असून सर्व ठिकाणे पुणे मनपाच्या सोशल मिडिया व वेब वर देण्यात आली आहेत. 
       मा. आयुक्त सौरव राव यांनी नागरीक व मान्यवर व्यक्तींनी आपल्या निवासस्थाना जवळील भागात सहभागी व्हावे अशी विनंती केली आहे.
        स्वच्छतेचा जागर करणे,प्रचार व प्रसार करणे,स्वच्छता ही सेवा हे लोकांच्या मनी वसावे म्हणून हा "प्लॅगोथाॅन २०२०" घेतलेला आहे.
     एकच लक्ष्य :: प्रथम पुणे !!
एकच ध्यास ::कचरामुक्त पुणे !!
एकच नारा ::चला करू आपलं पुणे प्लॅस्टिक मुक्त !!
आपलं पुणे -
स्वच्छ पुणे ::स्मार्ट पुणे !!
पुण्याची संस्कृती ::स्वच्छतेला देती साथ !!
ज्ञानेश्वर मोळक सह आयुक्त.