राहुल गांधीसमोर शेळी बनलेल्या शिवसेनेने आमच्यावर पायातील जोडे हातात घेण्याची वेळ आणू नये – महापौर सौ.उषा उर्फ माई ढोरे

कृपया प्रसिद्धीसाठी


राहुल गांधीसमोर शेळी बनलेल्या शिवसेनेने आमच्यावर पायातील जोडे हातात घेण्याची वेळ आणू नये – महापौर सौ.उषा उर्फ माई ढोरे


पिंपरी, दि. २४ – राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्यानंतर शिवसेनेने त्यांचा निषेध करायला हवा होता. परंतु, या मुद्दयावर शिवसेना सत्तेच्या लोभापायी तोंड लपवून गप्प बसली. उलट अमृता फडणवीस यांच्या निषेधासाठी शिवसेनेने आंदोलन केले. शिवसेनेची ही कृती निंदनीय आहे. काँग्रेससमोर शेळी बनलेल्या शिवसेनेने एका महिलेचा निषेध करून आपण वाघ असल्याचा दाखविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आम्ही कदापि खपवून घेणार नाही. महिलांचा मान राखणे हे शिवसेनेच्या संस्कृतीत बसत नसल्याचेच महिला शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. आमच्या पायातही जोडे आहेत हे शिवसेनेने ध्यानात ठेवावे. जशास तसे उत्तर देण्याची आमच्यातही हिंमत असून, शिवसेनेने पायातील जोडे हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नये, असे घणाघाती प्रत्युत्तर महापौर माई ढोरे यांनी दिले आहे.


 याबाबत महापौर माई ढोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारे वक्तव्य केले. सावरकरांचा असा अपमान आजपर्यंत कोणी केला नाही. हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या शिवसेनेने या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांचा साधा निषेध सुद्धा केला नाही. शिवसेना सत्तेच्या लोभापायी तोंड लपवून गप्प बसली. काँग्रेसच्या ताटाखालची मांजर झाली. याउलट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी “ठाकरे आडनाव असल्यामुळे कोणी ठाकरे होत नाही”, असे केलेले वक्तव्य शिवसेनेला चांगलेच झोंबले आहे. हिंदु