"लोहगाव परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई", लोहगाव,वडगाव शिंदे रस्ता, हरण तळे परिसरातील एकूण ५,मिळकतीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात

कृपया प्रसिद्धीकरिता,
२४/१२/२०१९,
"लोहगाव परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई",
लोहगाव,वडगाव शिंदे रस्ता, हरण तळे परिसरातील एकूण ५,मिळकतीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यातज येउन सुमारे २१,६०० चौ, फूट,क्षेत्र मोकळे करण्यात आले,
सदर मिळकतदार यांना महाराष्ट्र प्रांतिक अधिनियम १९४९ अंतर्गत ५३, अन्वये,नोटिसा देण्यात आलेल्या होत्या,
सदरची कारवाई कार्यकारी अभियंता जयंत सरवदे,यांचे नियंत्रणातर्गत पूर्ण करण्यात आली,
कारवाईत कनिष्ठ अभियंता-किरण कलशेट्टी,दत्तात्रय चव्हाण,मनोजकुमार मते, स्थानिक पोलीस,१० बिगारी,व ज्वा कटर मशीन च्या सहाय्याने पूर्ण करण्यात आली,
पुणेमहानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येते की या भागातील घरे, व्यावसायिक गाळे,अशा मिळकती घेण्यापूर्वी नागरिकांनी आपली आर्थिक फसवणूक व नुकसान होऊ नये याकरिता अशा बांधकामाबाबत सखोल चौकशी करूनच व्यवहार करावेत,
वरीलप्रमाणे भागातील अनधिकृत बांधकामावर यापुढेही सातत्याने कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाचे वतीने कळविण्यात आले आहे,
-संजय मोरे,
माहिती व जनसंपर्क अधिकारी,
पुणे महानगरपालिका,