*३१ डिसेंबर दुध पिऊन साजरा...!!*

*३१ डिसेंबर दुध पिऊन साजरा...!!*


*'सुप्रभात योगा'* च्या वतीने आज (३१ डिसें.) निमित्त सकाळी 'योगा वर्ग' झाल्यानंतर, पहाटे... *३१ डिसेंबर दारू न पिता 'दूध' पिऊन साजरा करण्यात आला.'* दिवसाची सुरुवात आणि सरत्या वर्षाचा शेवट अशा या चांगल्या संकल्पनेतून करण्यात आली. आपले शरीर व्यसनं करून खराब करण्यापेक्षा दूध देऊन सुदृढ ठेवणे गरजेचे आहे. *'आरोग्यम् धनसंपदा...'* हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमच्या *'सुप्रभात योगा' धनकवडी* टिमने च्या माध्यमातून २०१९ या सरत्या वर्षाला निरोप देताना आज हा अनोखा दृढ निश्चय करण्यात आला. *'धनकवडी लवकरच योगा केंद्र म्हणून ओळखले जाईल...' यात आमच्या ग्रुपचा मोठा वाटा असेल.* आज सकाळी ०५.३० ते ०७.३० वा. ह्या वेळेत 'सुप्रभात योगा' च्या वतीने धनकवडी ३ ठिकाणी मध्ये 'मोफत योगा वर्ग' चालतो. 2020 या नवीन वर्षाचं स्वागत करताना... मनामध्ये नवीन आशा, अपेक्षा आणि निरोगी राहण्याचा संकल्प करण्यात आला. निरोगी राहण्याची शपथ व सर्वांना निरोगी ठेवण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. 


*'आम्ही आज दारू पिणार नाही, तर 'दूध' पिऊन ३१ डिसेंबर साजरा करणार...!'*


यावेळी संतोष शिंदे, भिकाजी साळुंखे, विजय तावरे, योगशिक्षक सुनिल भालेराव सर, सुरेश गोळे, अशोक वाळुंजकर, प्रफुल्ल कुंभार, मुकुंद गुरव, जयकर कदम, सौ. सुरेखा तावरे, सौ. सुषमा साळुंखे, सौ. वैशाली रमाने, सौ. शोभा नलावडे, सौ. संगीता कुलकर्णी, सौ. माधुरी शेडगे आदी उपस्थित होते. मा. बळीराम थोपटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन सौ. सुरेखा तावरे यांनी केले.


*करें योग... रहें निरोग...!!*-----------------------------------------------------------