उधोग समूहाचे सहकार्याने विणकर,बलूतेदार,व बेरोजगार तरुण तरुणी उधोजकांसाठी मेळाव्याचे आयोजन

आज दि.25* 12*2019 रोजी    नागपूर महाल परिसरातील  शिक्षक सहकारी ‌ बँकेच्या सभागृहात स्व.अटृल बिहारी वाजपेयी यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय विणकर सेवा संघाने ,खादी ग्रामोधोग,पंतप्नधान रोजगार निर्मीती,व पुर्ती उधोग समूहाचे सहकार्याने विणकर,बलूतेदार,व बेरोजगार तरुण तरुणी उधोजकांसाठी मेळाव्याचे आयोजन करुन हा उधोग निर्मीतीचा "संकल्प दिवस" जाहीर केला,या मेळाव्याचे अध्यक्ष- संघाचे संस्थापक अध्यक्ष रमेश दादा भाकरे ( डायरेक्टर सांगली अर्बन को.आॅप.बँक ली) हे होते.रमेश भाकरे यानी प्नास्ताविक केले तर  या मेळाव्याचे उदघाटन स्व.अटृलजीच्या प्नतीमेचे पूजन व दीप प्नज्वलीत करुन मा.आ.रामभाऊ गुंडीले यांनी केले तर समारोप मा आ अनिल सोले यांनी केले याप्नसंगी डॉ सी पी कापसे संचालक खादी ग्रामोधोग नागपूर,डॉ.अनिल कांबळे सांगोला,सतिश दाभाडे माजी कामगार आयुक्त,शिवलींग टिरकी अध्यक्ष कर्नाटक, सुनिल मेटे यांची भाषणे झाली .संचलन राजू कोकरे यांनी केले