Press note
*३१ डिसेंबर रोजी रस्ता, वाहतूक सुरक्षा जनजागृतीसाठी 11 हजार शुभेच्छा पत्र आणि चॉकोलेट वाटप*
---
भारती विद्यापीठ ' इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ' (आय.एम.ई.डी.) विद्यार्थ्यांचा उपक्रम
पुणे:
जुन्या वर्षाला निरोप देवून नव्या वर्षाचे स्वागत करण्याच्या 31 डिसेंबर या दिवशी भारती विद्यापीठ 'इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट' (आय.एम.ई.डी.) च्या वतीने 'रस्ता सुरक्षा जनजागृती अभियाना'चे आयोजन करण्यात आले होते.
या अभियानातंर्गत पुणे शहरातील विविध भागातील प्रमुख 16 सिग्नलच्या ठिकाणी महाविद्यालयाच्या 1 हजार विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि वाहतुक सुरक्षा विषयी संदेश असलेल्या 11 हजार शुभेच्छा पत्रांचे आणि चॉकलेटचे वाटप केले.
या अभियानाचा शुभारंभ मंगळवारी सकाळी भारती विद्यापीठ भवन (अलका टॉकीज चौक) येथे झाला. यावेळी कुलगुरू डॉ माणिकराव साळुंखे, डॉ. सचिन वेर्णेकर (भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक ), डॉ.प्रा. अजित मोरे, डॉ.प्रा. विजय फाळके , डॉ. सीमा तारणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे विद्यार्थी आणि आयएमईडीमधील प्राध्यापक सहभागी झाले होते.
आयएमईडी एनएसएस विभाग प्रमुख डॉ. विजय फाळके, प्रा.स्वाती देसाई यांनी या अभियान उपक्रमाचे संयोजन केले .
या अभियानातंर्गत वाटण्यात आलेले 'पॉकेट शुभेच्छा पत्र' दोन पानी आहे, यामध्ये वाहतूक सुरक्षा याविषयी संदेश देण्यात आले आहेत. तसेच 'डिजीटल इंडिया' आणि 'स्वच्छ भारत अभियान' याविषयी देखील संदेशाचा यामध्ये समावेश आहे.
'रस्ते अपघातांची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे, ३१ डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर हे जनजागृतीपर अभियान राबविण्यात आले', अशी माहिती डॉ.सचिन वेर्णेकर यांनी दिली.
हे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान शहरातील प्रमुख चौकांमध्ये देखील आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अलका टॉकीज चौक, कोथरूड डेपो, परिहार चौक (औंध), स्वारगेट, कात्रज, शिवाजीनगर, कर्वे पुतळा (कोथरूड), कात्रज सिग्नल, गुडलक चौक, अभिरूची मॉल (सिंहगड रोड), राजाराम पूल, नळ स्टॉप इत्यादी चौकांचा समावेश होता.
..............................................