*पेरणे अभिवादन दिनानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी २६० बसेसची व्यवस्था* जिल्हाधिकारी नवल किशोर राम पुणे,दि.२५ : पेरणे (कोरेगाव भिमा) येथील अभिवादन दिन कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी दि.३१ डिसेंबर २०१९ व १ जानेवारी २०२० रोजी एकूण २६० बसेसची व्यवस्था करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. मौजे पेरणे येथे जयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या नियोजित वाहनतळापासून जयस्तंभापर्यंतच्या वाहतुक व्यवस्थेसंदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला महसूल विभागासह महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व पुणे महानगर परिवहन मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. पेरणे येथील अभिवादन दिन कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना वाहनस्थळापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत नेण्यासाठी दि.३१ डिसेंबर २०१९ व १ जानेवारी २०२० रोजी एकूण २६० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नियोजित वाहनतळापासुन जयस्तंभापर्यंत येणाऱ्या ग्रामस्थांची व नागरिकांची विनाशुल्क वाहतुक या बसेस करतील. त्यापैकी ६० बस दि.३१ डिसेंबर २०१९ रोजी व २०० बस दि. १ जानेवारी २०२० रोजी उपब्ध असतील, यात ३० मिनीबसचा देखील समावेश असेल, असेही त्यांनी सांगितले. नियोजित वाहनतळांची माहिती लवकरच प्रसिध्द केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. राम यांनी दिली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड चे संबंधित अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. 00000000

*पेरणे अभिवादन दिनानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी २६० बसेसची व्यवस्था*
जिल्हाधिकारी नवल किशोर राम


पुणे,दि.२५ :   पेरणे (कोरेगाव भिमा)   येथील अभिवादन दिन कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी दि.३१ डिसेंबर २०१९ व १ जानेवारी २०२० रोजी एकूण २६० बसेसची व्यवस्था करण्यात आली असल्याचे  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
 मौजे पेरणे येथे जयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या नियोजित वाहनतळापासून जयस्तंभापर्यंतच्या वाहतुक व्यवस्थेसंदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला महसूल विभागासह महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ व पुणे महानगर परिवहन मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
 पेरणे येथील अभिवादन दिन कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना वाहनस्थळापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत नेण्यासाठी दि.३१ डिसेंबर २०१९ व १ जानेवारी २०२० रोजी एकूण २६० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नियोजित वाहनतळापासुन जयस्तंभापर्यंत येणाऱ्या ग्रामस्थांची व नागरिकांची विनाशुल्क वाहतुक  या बसेस करतील. त्यापैकी ६० बस दि.३१ डिसेंबर २०१९ रोजी व २०० बस दि. १ जानेवारी २०२० रोजी उपब्ध असतील, यात ३० मिनीबसचा देखील समावेश असेल, असेही त्यांनी सांगितले.
 नियोजित वाहनतळांची माहिती लवकरच प्रसिध्द केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. राम यांनी दिली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड चे संबंधित अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.


00000000