स्त्री शिक्षण प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंतिंनिमित्त ना.डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण.

 पुणे प्रवाह न्युज पोर्टल


पुणे  :- ‌ भारतीय स्त्री शिक्षणाच्या आदय प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.सिल्व्हर रॉक्स या त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी स्त्री आधार केंद्राच्या ट्रस्टी जेहलम जोशी,शिवसेना प्रणित स्थानिक लोकाधिकार समिति पदाधिकारी  शिरीष फडतरे,लतिकाताई गो-हे,समुपदेशक स्त्री आधारकेंद्राचे शेलार गुरुजी,अनीता शिंदे,अनिता परदेशी,संजय व जयश्री शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना डॉ.नीलमताई गो-हे यांनी आज समाजात स्त्रियांना बरोबरीचे स्थान मिळत आहे यांच्या कर्तुत्वास मान्यत मिळत आहे याचे कारण म्हणजे सवित्रिबाई फुले यांनी केलेला त्याग व पुढाकार,त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली,तसेच सती प्रथेस विरोध केला.बलात्काराने जन्मलेल्या मुलींची हत्या होवूनये यासाठी बालहत्याप्रतिबंधक संस्थाची स्थापना केली.मात्र समाजात आजूनही  महिलांवरील होणारे अत्याचार व शोषण पाहता.सावित्रीबाई फुलेंचे कार्य समाजाने पुन्हा सुरू केले पाहिजे असे संगितले.तसेच यावेळी महाराष्ट्रात कृतीदशक २०२० ते २०३०या निमित्ताने महिला प्रबोधन मंच याची स्थापना करीत असल्याची घोषणा केली.समाज व सरकार यांच्या सहकार्याने योजना व महिला विकास कार्यक्रम अंमलबजावणी करण्याचे कार्य करणार असल्याचे प्रतिपादन केले.   

छायाचित्र :पुष्पहार अर्पण प्रसंगी ना.डॉ.नीलम गो-हे व अन्य मान्यवर

Popular posts
तरुणांनी राज्यशासन व केंद्राच्या योजनेचा लाभ घेवून उद्योजक बनावे – पी.टी काळे
Image
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय
Image
साहेब मी एक  साधा  पत्रकार आहे..* कर्जत माथेरान नेरळ   :  गणेश पवार दै.शिवतेज✍️
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image