पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी प्रदेश निरीक्षक समक्ष अशोकराव मोरे ह्यांची भरघोस समर्थनासह मुलाखत
निवेदन प्रत आणि स्वाक्षऱ्या सोबत जोडत आहोत.
आज दि. २४/११/२०२० रोजी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदासाठी निगड़ी स्थित श्री हरिदास नायर यांच्या कार्यलयात प्रदेश काँग्रेस कमिटी कडून आलेले महासचिव व निरीक्षक श्री राजेश शर्मा जी आणि नाशिक शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व निरीक्षक श्री शरद अहिर जी यांनी इच्छुकांची मुलाखात घेतली.
यावेळी अशोकराव मोरे यांनी ही मुलाखात देऊन समर्थकांच्या स्वाक्षऱयांसह निवेदन दिले. या निवेदनात नमूद करण्यात आले की जर अशोकराव मोरे यांची निवड़ करण्यास काही अडचण येत असेल तर श्री कैलाश कदम किंवा श्री मनोज कांबळे यांची निवड़ करण्यात यावी.
सदर निवेदनच्या समर्थानात पिंपरी मनपा चे मा. विरोधीपक्ष नेते माननीय श्री कैलाशभाऊ कदम, मा. नगरसेवक रामचंद्र माने, विश्वास गजरमल, अख्तर चौधरी, एन एस यू आई चे मा. प्रान्ताध्यक्ष मनोज कांबळे, पिंपरी चिंचवड युवक कांग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी चिंचवड कांग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष उमेश बनसोडे, शिक्षण मंडळाचे मा. सभापति अभिमन्यु दहितूले, रवि खन्ना, एन एस यू आई चे शहराध्यक्ष डॉ. वसीम इनामदार, एन एस यू आई चे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खन्दारे, अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेसचे शहराध्यक्ष किसन कचेरीया यांनी लेखी/समक्ष अशोकराव मोरे यांच्या उम्मेदवारीला समर्थन दिले.