जिजाऊ लावणार शिवबा आणि साईबाई यांचं लग्न - 'स्वराज्यजननी जिजामाता विवाह-सप्ताह विशेष' ५-१० ऑक्टोबर..... सोनी मराठीवर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत होणार शिवबांचा विवाह-सोहळा


OR



मुंबई :- स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत जिजाऊंनी शिवबांना हाताशी घेऊन पुण्याची पुनर्बांधणी सुरू केली आहे. शहाजी राजांनी पाठवलेली कवड्यांची माळ मिळवण्यास आपण पात्र आहोत, हे शिवबांनी सिद्ध केलं आणि भोसल्यांचं लेणं असलेली कवड्यांची माळ अभिमानानं परिधान केली.


दरम्यान शिवबांच्या आयुष्यातल्या महतत्त्वपूर्ण घटना स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. लवकरच शिवबा आणि सईबाई यांचा विवाह-सोहळा पार पडणार आहे. शिवबा आणि सईबाई यांच्या लग्नाची रंजक कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


जिजाऊंनी फलटणचे निंबाळकर यांच्या सईबाईंशी शिवबांचा विवाह ठरवला याला बरीच राजकीय कारणं होती. स्वराज्य स्थापनेच्या मोहिमेतलं ते एक महत्त्वाचं पाऊल होतं. शिवबा आणि सईबाईंच्या लग्नाला शहाजीराजे बंगळूरहून पोचू शकले नाहीत, तेव्हा जिजाऊंनी एकट्यांनी शिवबांच्या लग्नाची जबाबदारी लीलया पेलली. ही सोयरीक जुळावी ह्यासाठी जिजाऊ जितक्या प्रयत्नशील होत्या, तितकाच किंबहुना त्याहून अधिक प्रयत्न ही सोयरीक जुळू नये, ह्यासाठी शत्रू पक्ष करत होता. पण आजपासून साधारण पावणे चारशे वर्षांपूर्वी अमीनसारखा बलाढ्य शत्रू समोर असताना एकट्या स्त्रीनं शिवबांचं लग्न व्यवस्थित पार पाडलं होतं आणि हा रोमहर्षक आणि चित्तथरारक इतिहास आता या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 


स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर प्रेक्षकांना 'विवाह-सप्ताह' पाहायला मिळणार आहे. मुलखावेगळ्या आईची ही गाथा आता रंजक अशा वळणावर येऊन पोचली आहे. जिजाऊ रयतेचा जाणता राजा घडवत आहेत. पाहा, 'स्वराज्यजननी जिजामाता' सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.


Popular posts
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image