अबब... डिकसळ नाक्यावर नियोजित पोलिस चौकी ठिकाणी थाटले वडापाव चे दुकान (गणेश पवार याजंकडून)

पुणे प्रवाह न्युज पोर्टल



कर्जत,ता.21 गणेश पवार


              कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर डिकसळ गावाच्या नाक्यावर ग्रामपंचायतने रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या सुचनेने पोलीस चौकी बांधण्याचे काम सुरू केले होते.मात्र बंद असलेले पोलीस चौकीच्या जागेवर आता वडापाव चे दुकान थाटण्यात आले आहे.दरम्यान,2018 मध्ये हीच ग्रामपंचायत नेरळ पोलीस ठाणे यांना तेथे पोलीस चौकीचे काम असल्याचे पत्र पाठवते आणि तीच ग्रामपंचायत ऑक्टोबर 2020 मध्ये पत्र लिहून डिकसळ गावात कुठेही पोलीस चौकी नसल्याचा ठराव घेते?हे कसं काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.


                  कज॔त तालुक्यातील उमरोली ग्राम पंचायत हद्दीत डिकसळ नाक्यावर पोलिस चौकी व्हावी यासाठी ग्रामस्थ किशोर गायकवाड यांनी रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पत्र व्यवहार करून भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन आणि कर्जत-कल्याण राज्यमार्ग लक्षात घेऊन नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस चौकी उभारण्याची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाने उमरोली ग्रामपंचायत ने डिकसळ नाक्यावर पोलीस चौकीचे काम सुरू 2016 मध्ये केले होते, आणि 2018 पासून ते काम बंद पडले होते.मात्र काही वर्षे ते काम बंद असल्याने त्या अर्धवट बांधकाम केलेल्या मोकळ्या जागेत आता वडापावचे दुकान सुरू केले आहे.4/1/2018 रोजी उमरोली ग्रामपंचायतने नेरळ पोलीस ठाणे यांना दिलेल्या पत्रात पोलिस चौकीचे काम सुरू आहे असे कळविले होते.पण आता तीच उमरोली ग्रामपंचायत 13/10/2020 रोजीचे पञ काढून दिकसळ गावात कुठेही पोलिस चौकी नाही आणि पोलीस चौकीचे काम देखील सुरू नाही असा ठराव घेऊन कळवित आहे.याबाबत पोलीस चौकीसाठी पाठपुरावा करणारे ग्रामस्थ आणि रायगडभूषण किशोर गायकवाड यांनी उमरोली ग्राम पंचायत किती अभ्यासू ग्रामपंचायत आहे हे सिद्ध होते असा टोला ग्रामपंचायत ला मारला आहे.त्या ठरावावर डिकसळ गावातील ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या आहे.त्यामुळे कितीही चोऱ्या झाल्या आणि घरफोडी झाल्या किंवा अन्य घटना घडल्या तरी डिकसळ ग्रामस्थांना पोलीस चौकी नको हे सिद्ध होत आहे.


फोटो ओळ 


डिक्सल पोलीस चौकीच्या जागेवर सुरू झालेले वडापाव चे दुकान