अत्याधुनिक नेत्र रुग्णालये काळाची गरज: आमदार रोहित पवार कै. दत्तात्रय वळसे पाटील नेत्र हॉस्पिटलचे कार्य कौतुकास्पद

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



पुणे दि. डोळ्यांचे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत, मात्र रुग्णांना त्यासाठी अत्याधुनिक उपचार देणाऱ्या  रुग्णालयांची व्याप्ती वाढविणे ही काळाची गरज  आहे. असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी येथे केले. 


बोपोडी येथे महापालिकेच्या माध्यमातून आणि माजी नगरसेवक श्रीकांत पाटील यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या कै. दत्तात्रय वळसे पाटील नेत्र हॉस्पिटलला आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन तेथील अत्याधुनिक उपचारांची माहिती घेतली.यावेळी माजी नगरसेवक श्रीकांत पाटील,डॉ. अंबरीश दरक ,  माजी सभागृहनेता निलेश निकम , अनिता पवार आदींसह  मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार रोहित पवार यांनी  कै. दत्तात्रय वळसे पाटील नेत्र हॉस्पिटलमधील अत्याधुनिक उपचारांची माहिती घेऊन पाहणी केली. महापालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारचे अद्यावत नेत्र हॉस्पिटल साकारले आहे, ही  बाब कौतुकास्पद असून पाठपुरावा करून या हॉस्पिटलची उभारणी केल्याबद्दल माजी नगरसेवक श्रीकांत पाटील यांचे कौतुकही त्यांनी केले.