तब्बल तीन वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर केलेल्या व IPL च्या प्रत्येक पर्वात play off पर्यत मजल मरणाऱ्या सीएसके ला प्रथमच अपयश पचवावे लागेल

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


**


*पुणे :-* Indian Premier League


(IPL 2020) च्या १३व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्जच्या बाबतीत धक्कादायक निकाल पाहायला मिळाला.तब्बल तीन वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर केलेल्या व IPL च्या प्रत्येक पर्वात play off पर्यत मजल मरणाऱ्या सीएसके ला प्रथमच अपयश पचवावे लागेल . राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई या दोन्ही संघासाठी सामना अत्यंत महत्त्वाचा होता. त्यामुळे सामना रंगतदार होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण, धोनीच्या संघातील दिग्गजांनी आज पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना निराश केलं आणि चेन्नईचा दारुण पराभव झाला. एकतर्फी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स ने बाजी मारून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले.


चेन्नई सुपर किंग्स या पराभवानंतर १० सामन्यांत ७ पराभवासह तळाला


समाधान मानावे लागले आहे. आजच्या निकालानं त्यांना प्ले


ऑफच्या शर्यतीतूनही जवळपास बाहेर फेकले आहे. राजस्थान


रॉयल्सनं १० सामन्यांत ४ विजयासह फलंदाजीला आलेल्या फॅफ ड्यू प्लेसिस आणि सॅम करन यांना मोठे फटके मारण्यापासून राजस्थान


८ गुणांची कमाई करत आव्हान कायम राखले आहे. प्रथम


रॉयल्सच्या गोलंदाजांनी रोखले. आर्चरच्या बाऊंसरवर एक्स्ट्रा


कव्हरच्या दिशेनं फटका मारणारा फॅफ ड्यू प्लेसिसला (१०) माघारी जावं लागले. शेन वॉटसन (८),


अंबाती रायुडू (१३) आणि सॅम करन ( २२) माघारी परतले. त्यामुळे या धक्क्यातून सीएसके ची टिम सावरली नाही. आणि मोक्याच्या क्षणी मिळालेल्या संधीचा फायदा घेत राजस्थान रॉयल्स संयमी फलदायी करत, चेन्नई चा पराभव करत, या मौसमात आपले आव्हान कायम राखण्यात सध्या तरी यशस्वी झाले आहेत.


Popular posts
छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी.
Image
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
महाराष्ट्राचे मामु आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप वाल्यांची जुनी खोड...... विशाल भोसले. कट्टर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक
कोरोना काळातील सेवेबद्दल डॉ.सुनीता मोरे यांचा गौरव
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी – चिंचवड येथे  ऑनलाईन अपॉंइटमेंट असणा-यांनी चाचणीकरीता हजर राहण्याचे आवाहन