पुणे प्रवाह न्युज पोर्टल
बोपखेल मधील गणेशनगर येथे सम – विषम तारखेस पार्किंगबाबतचे
तात्पुरत्या स्वरुपात आदेश निर्गमित
पुणे दि.4 : - पिंपरी – चिंचवड शहरातील वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होण्याकरीता यापूर्वीचे काही निर्बंध रद्द करण्यात आले असून दिघी आळंदी वाहतुक विभाग हद्दीतील प्रभाग क्र.4 मधील गणेशनगर मुख्य रस्त्यावर वाहतुक कोंडी होत असल्याने बोपखेल मधील गणेशनगर येथील हनुमान मंदीर या मुख्य रस्त्यावर सम – विषम तारखेस पार्किंगबाबतचे तात्पुरत्या स्वरुपात आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
या आदेशाबाबतीत नागरिकांच्या काही सूचना असल्यास त्या पोलीस उपआयुक्त, वाहतुक शाखा, पिंपरी –चिंचवड यांच्या कार्यालयात दि. 5 सप्टेंबर 2020 ते दि.19 सप्टेंबर 2020 पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, नागरिकांच्या सूचना व हरकतींचा विचार करुन व अत्यावश्यक सेवेतील वाहने ( उदा.फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इ.) खेरीज करुन अंतिम आदेश काढण्यात येईल अशी माहिती पिंपरी- चिंचवड, वाहतुक शाखेचे पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.
0 0 0 0