पुणे विभागातील 2 लाख 16 हजार 270 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,विभागात कोरोना बाधित 2 लाख 90 हजार 884 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे प्रवाह न्युज पोर्टल   पुणे,दि.9 :- पुणे विभागातील 2 लाख 16 हजार 270 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 90 हजार 884 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 66 हजार 977 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 7 हजार 637 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.63 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 74.35 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 


*पुणे जिल्हा*


  पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 14 हजार 5 रुग्णांपैकी 1 लाख 59 हजार 986 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 36 हजार 805 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 614 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.43 टक्के आहे. 


*सातारा जिल्हा*


   सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 19 हजार 609 रुग्णांपैकी 11 हजार 451 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 622 आहे. कोरोनाबाधित एकूण 536 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


*सोलापूर जिल्हा*


    सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 21 हजार 667 रुग्णांपैकी 15 हजार 591 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 226 आहे. कोरोनाबाधित एकूण 850 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  


 *सांगली जिल्हा*


               सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 18 हजार 281 रुग्णांपैकी 9 हजार 917 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 661 आहे. कोरोनाबाधित एकूण 703 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


*कोल्हापूर जिल्हा*


  कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 29 हजार 922 रुग्णांपैकी 19 हजार 325 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 663 आहे. कोरोनाबाधित एकूण 934 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ 


कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 6 हजार 21 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 619 सातारा जिल्ह्यात 621, सोलापूर जिल्ह्यात 403, सांगली जिल्ह्यात 573 तर कोल्हापूर जिल्ह्यात 305 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.


*पुणे विभागातील सर्व्हेक्षण*


आजपर्यत विभागामध्ये एकुण 13 लाख 38 हजार 800 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 90 हजार 884 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


( टिप :- दि. 8 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )


*


Popular posts
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय
Image
सावित्रीमाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील क्रांतिकारक योगदान:-
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री. *बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त* शिवसेना-युवासेना  वर्षी तसेच महाविकासाघाडी आनि वर्षी ग्रामस्थ यांच्यातर्फे बाळासाहेब ठाकरे ना अभिवादन' करण्यात आले
Image