दिग्दर्शक श्री सचिन अशोक यादव यांचा कोंदण हा पहिला मराठी चित्रपट आहे जो कोरोना काळात online या https://www.cinemapreneur.com OTT वेबसाईट वर 1अॉगस्ट 2020 ला release झालेला आहे. 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*Press note*


कोरोना च्या या कठीण काळात संपूर्ण Bollywood चित्रपटसृष्टी पुन्हा नव्या जोमाने उभी राहतेय. नवीन येणारे बरेच मोठे हिंदी चित्रपट online release होत आहेत तर आपली मराठी चित्रपटसृष्टी देखील या मध्ये मागे कशी राहिल. सांगली जिल्हा ता. खानापूर गाव नागेवाडी येथील


आत्मनिर्भर भारताच्या आत्मनिर्भर झालेल्या पहिल्या महिलेची कथा म्हणजेच कोंदण


 


या चित्रपटाची कथा सत्य घटनेशी प्रेरित असून अगदी वास्तवदर्शी पात्रे आपल्याला यात दिसून येतात. 


  शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्याची बायको त्याच्या दोन्ही लहान मुलांना घेऊन एकटी कोणावरही अवलंबून न राहता , संकटाना हसून तोंड देत, कशी आत्मनिर्भर होते, हे या कथेत आपणांस पाहायला मिळतं.


  या कथेत कृष्णा पवार हा शेतकरी दुष्काळामुळे, कर्ज न फेडता आल्याने आत्महत्या करतो. कृष्णाच्या आत्महत्येनंतर सरकारकडून मिळणारे अनुदान भ्रष्ट आधिकारी लूटतात. व त्याची बायको रूक्मिणी हिची फसवणूक करतात. तिथून तिच्या आयुष्याला संघर्षमय कलाटणी मिळते व तिच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाची सुरूवात होते संपूर्ण माळरानावर कोणाचीही मदत न घेता तिच्या मुलांचा सांभाळ करत ती शेतीला सुरूवात करते. त्यात बऱ्याच अशक्य वाटणाऱ्या आणि जीवघेण्या अडचणी देखील येतात. परंतु या सर्व अडचणींवर मात करून रूक्मिणी आणि दिपक आत्मनिर्भरतेने कशी शेती पिकवतात. हे आपणांस पाहायला मिळते 


चित्रपटाची निर्मिती संस्था नाट्यवेद आर्टस् 


व निर्माते आहेत श्री अशोक यादव आहेत.


चित्रपटात मुख्य भुमिकेत आहेत समिक्षा कदम ,विक्रांत केदारे ,सतीश निकम व बालकलाकार गुरूनाथ हिंदळेकर , आणि नागेवाडी गावातील इतर कलाकारांचा देखील समावेश आहे. चित्रपटात "मन आभाळ" हे एकमेव गाणं आहे जे चित्रपटाला वेगळ्या उंचीवर घेऊन जातं. या गाण्याचे गीतकार व संगीतकार आहेत एकनाथ मोरे व कुणाल खाडे आणि चित्रपटाचे पार्श्वसंगीत दिले आहे चिराग सोनी व राजेंद्र साळुंके ह्यांनी . त्यासोबतच 


डॉ. शांताराम कारंडे फॕन्स फाऊंडेशन व उत्तुंग थिएटर्स यांचे सुद्धा विशेष सहकार्य चित्रपटाला लाभले आहे. 


कोंदण चित्रपट खालील वेबसाईट वर दिलेल्या पद्धतीनुसार आपणांस पाहता येईल.


now streaming on OTT platform - www.cinemapreneur.com


अॉनलाईन direct टिकीट घेण्यासाठी - visa debit / credit card or mastercard card चा वापर करावा.


 


इतर payment पर्यायांसाठी (Rupay card , Googlepay, Phonepe etc.)पुढील लिंकवर click करा . https://www.instamojo.com/cinemapreneur