थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२० व्या जयंतीनिमित्त शनिवार वाड्यावरील पुतळ््याला अभिवादन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 



 थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे पुष्पहार अर्पण


 


पुणे : एनडीएमध्ये बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारण्यात येणार होता, त्याला मान्यता मिळाली असून लवकरच या कामाला सुरुवात होईल. त्याचबरोबर महानगर पालिकेने शनिवार वाड्यामध्ये बाजीराव पेशवे यांच्या युद्धाचे प्रसंग दाखविले तर तरुणांना त्यातून प्रेरणा मिळेल आणि पेशव्यांचा इतिहास लक्षात येईल, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी व्यक्त केले.


 


थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२० व्या जयंतीनिमित्त शनिवारवाड्यावरील त्यांच्या पुतळ््याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, संस्थेचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, पेशव्याचे वंशज श्रीमंत उदयसिंहजी पेशवा आणि कुटुंबिय, संस्थेचे उपाध्यक्ष अनिल गानू, सचिव कुंदनकुमार साठे, विश्वस्त श्रीकांत नगरकर,चिंतामणी क्षिरसागर उपस्थित होते. 


 


कुंदनकुमार साठे म्हणाले, दरवर्षी संस्थेतर्फे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त शौर्य पुरस्कार देण्यात येतो. परंतु यंदा कोरोनाच्या महामारीमुळे पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. यापूर्वी परमवीरचक्र विजेते बाणासिंग, अंतराळवीर राकेश शर्मा, लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, कॅप्टन दिलीप दोंडे यांना सन्मानित करण्यात आले आहे. 


 


*फोटो ओळ - थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२० व्या जयंतीनिमित्त शनिवारवाड्यावरील त्यांच्या पुतळ््याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.