‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीवर चित्रपटांचा फेस्टिव्ह धमाका

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


  


 


 


ऑगस्ट महिना सुरु झाला की, सणासुदीची चाहूल लागते. या सणासुदीचा आनंद आणखी द्विगुणित करण्यासाठी ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने रसिकप्रेक्षकांसाठी चित्रपटांचा खजिना आणला आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चित्रपटांचा हा फेस्टिव्ह धमाका ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीवर रंगणार आहे. १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर ‘रझाकार’ या चित्रपटाने त्याचा ‘श्रीगणेशा’ होणार आहे.


 


हैदराबाद मुक्ती संग्रामातलं सुवर्णपान असणारी विजयगाथा म्हणजे ‘रझाकार’ हा चित्रपट. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निझामाच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी मराठवाड्यातील जनतेला लढा उभारावा लागला होता. साधारण सात दशकांपूर्वी निझामाने आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ज्या अतिरेकी संघटनेची मदत घेतली होती, तिचा इतिहासामध्ये उल्लेख ‘रझाकार’ म्हणून केला जातो. वेगळा विषय असलेला हा चित्रपट शनिवारी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर १५ ऑगस्टला दुपारी १२.०० वा. व सायं ७.०० पहाता येईल. 


 


एका प्रामाणिक शिक्षकाचा डॉन कसा होतो या संकल्पनेवर आधारित जॅकी श्रॉफ, उर्मिला मातोंडकर, आदित्य पांचोली, चिन्मयी सुमीत या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'हृदयनाथ' हा चित्रपट रविवार २३ ऑगस्टला दुपारी १२.०० वा. व सायं ७.०० पहायला मिळेल. गिरणी कामगारांच्या समस्येचा वेध घेताना लालबाग-परळच्या बदलाचं भीषण वास्तव मांडणारा महेश मांजरेकर दिग्दर्शित मल्टीस्टारर ‘लालबाग परळ’ या धमाकेदार चित्रपटाची मेजवानी रविवार ३० ऑगस्टला दुपारी १२.०० वा. व सायं ७.०० घेता येईल.


 


शिवाजी महाराजांच्या मनात स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे बीज ज्या आईने पेरलं, ती आई म्हणजे जिजाऊसाहेब. एका आदर्शवत गुरुप्रमाणे जिजाऊंनी आपल्या विचार व संस्कारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले. ५ सप्टेंबरला शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘राजमाता जिजाऊ’ हा चित्रपट रविवार ६ सप्टेंबरला दुपारी १२.०० वा. व सायं ७.०० दाखविण्यात येणार आहे.


 


लग्न म्हणजे आपल्या आयुष्याला नवं वळण देणारी घटना असते. पण आजच्या धकाधकीच्या आयुष्यात, स्पर्धेच्या ताणतणावात लग्न टिकून राहाणं, हे एक आव्हान बनलंय. हाच विषय हाताळताना एक तरल, म्युझिकल प्रेमकथा मांडणाऱ्या ‘लग्न पहावे करून’ या चित्रपटाचा आस्वाद रविवार १३ सप्टेंबरला दुपारी १२.०० वा. व सायं ७.०० घेता येईल. तीन मित्रांचा स्ट्रगल दाखविताना जगण्यासाठी त्यांना कराव्या लागणाऱ्या नाना उद्योगांची खुशखुशीत कहाणी सांगणारा ‘घंटा’ या मनोरंजक चित्रपटाची मेजवानी रविवार २० सप्टेंबरला दुपारी १२.०० वा. व सायं ७.०० घेता येईल. आई मुलाच्या हळव्या नात्यावर भाष्य करणारा स्वप्नील जोशी अभिनीत ‘भिकारी’ हा चित्रपट रविवार २७ सप्टेंबरला दुपारी १२.०० वा. व सायं ७.०० पहायला मिळेल.


 


सिनेरसिकांसाठी या सगळ्या सिनेमांचा आस्वाद घेणं ही एक भन्नाट ट्रीट असणार आहे.


 


‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीविषयी 


 


पाच दशकांहून अधिक वर्षे संगीत आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणा-या शेमारू एंटरटेनमेंट कंपनीने मराठी सिनेरसिकांसाठी ‘शेमारू मराठीबाणा’ हे चॅनेल सुरू केले आहे. मराठी सिनेरसिकांसाठी फक्त मराठी चित्रपटांना वाहिलेले चॅनल. वाहिनीचे नाव ‘मराठी बाणा’ हे सुद्धा मराठी अस्मितेशी निगडीत असून मराठी संस्कृतीचा प्रचार-प्रसार करण्यात, ती लोकप्रिय करण्यात ही वाहिनी महत्वाची भूमिका बजावते. चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीशी नाते जोडण्याचा वाहिनीचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.


 


डीडी फ्री डीशवर तसेच अनेक केबल ऑपरेटर्सकडे हे चॅनल उपलब्ध झालेही आहे. उदा टाटा स्काय, एअरटेल डिजीटल टीव्ही, व्हिडिओकॉन डी २ एच, डिश टीव्ही, हॅथवे, जीटीपीएल, इन डिजिटल, स्कॉड१८, युसीएन,डेन