पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे : लक्ष्मीनगरचा राजा या पुण्यातील सर्वात मोठी गणेशमूर्ती (उंची २२ फूट) असलेल्या गणपतीची पहिली आरती एका मुस्लिम तरुणाच्या हस्ते शनिवारी झाली. या प्रसंगाने पुण्यात हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडले. असिफ शेख या मुस्लिम तरुणाच्या हस्ते लक्ष्मीनगरचा राजाची आरती झाली. हे गणेशोत्सव मंडळ सर्वात मोठी आणि उंच गणेशमूर्ती यासाठी प्रसिद्ध आहे. लक्ष्मीनगरचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष निलेश जाधव व उपाध्यक्ष रोहित वाजे यांनी याकामी पुढाकार घेतला.
असिफ शेख म्हणाले, "लहानपणापासूनच गणेशोत्सव हा आनंदाचा क्षण राहिला आहे. धर्माने मुस्लिम असलो, तरी पुण्यात शिकत असताना पुणे विद्यार्थी गृह संस्थेने सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. आज गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी बाप्पाची आरती करायला मिळणे हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो."