चिकनपाडा,पोशीर मधील नुकसानग्रस्त शेत जमीन लागवडी योग्य करून द्यावी या मागणी  शेतकऱ्यांचे आंदोलन 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 कर्जत,ता.17 गणेश पवार


                           


कर्जत :- तालुक्यात मागील दोन वर्षी झालेल्या अतिवृष्टीत माले चिकणपाडा रस्ता वाहून रस्त्याच्या लगत भात शेतीचे नुकसान होत आहे.त्यामुळे चिकनपाडा येथील शेतकरी रियाज हसन बोंबे यांच्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते .सदर ची भातशेती दुरुस्ती करून लागवडी योग्य करून द्यावी अशी मागणी सार्वजनीक बांधकाम विभागाकडे केली होती मात्र त्याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्याने रस्ता खोदुन वाहतुकीस बंद केल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.


                             मागील वर्षी 21 जुलै2019 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर येऊन माले चिकणपाडा रस्त्याचा सुमारे 100 मीटर भाग पूर्णतः वाहून गेला होता.परिणामी पाण्याच्या प्रवाहाने रस्त्याच्या लगत असलेल्या रियाज हसन बोंबे यांच्या भात शेतीत दगड, मातीचा भराव,तसेच रस्त्याची खडी, डांबर जाऊन यांच्या शेतीची नासधूस झाली होती.रस्ता वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती मोरी बसवून रस्ता रहदारीस खुला केला.आजतागायत हा रस्ताचे काम झाले नसल्याने यावेळी ही वाहून जाण्याची भीती कायम आहे.दरवर्षी या रस्त्याची काम केले जाते मात्र काम दर्जेदार नसल्याने पावसाळी दिवसात वाहून जाते.याचा फटका दरवेळेस प्रवाशांबरोबरच शेतकऱ्यांना ही बसत आहे.दरवर्षी होत असलेल्या भात शेतीच्या नुकसानीमुले केवळ भात शेतीवर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब शेतकर्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.


                             कोरोनाच्या काळात बेजार झालेले शेतकरी निदान या हंगामात तरी शेतीतून काही उत्पन्न मिळावे अशा अपेक्षेत आहेत.यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पावसाळ्यापूर्वी,शेतात गेलेला रस्त्याचा भराव दगड, माती,डांबर खडी,इत्यादी जेसीबी च्या साह्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने काढून द्यावा.भातशेत या खरीप हंगामात लागवडी योग्य करून द्यावा अशी विनंती निवेदनाद्वारे अनेक वेळा केली आहे.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या कडे दुर्लक्ष केल्याने चिकनपाडा येथील शेतकरी रियाज बोंबे यांनी आक्रमक भूमिका घेत सदर चा रस्ता खोदून बंद केला असून परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे.


 


रियाज हसन बोंबे - नुकसानग्रस्त शेतकरी


आम्ही वारंवार बांधकाम विभागाकडे आमची शेती दुरुस्ती करण्यासाठी निवेदन दिली आहेत मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे यापुर्वी पावसाळा झालेनंतर पाईप मोरी टाकुन तात्पुरती केलेली दुरुस्तीचे पाईप मोरी काढण्यास हमीपत्र दिले असतांनाही कोणतीही उपाययोजना केली नाही मागच्या वर्षीच्या खरीप हंगामातील लागवड केलेली शेतीचे नुकसान होऊन आमचेवर उपासमारीचे संकट ओढवले असुन या हंगामात शेती लागवड केली नाही.तर आमचेवर आत्महत्येची पाळी येईल व त्यास सर्वस्व बांधकाम खाते जबाबदार राहील.आमच्या विनंतीचा सहानुभुती पुर्वक योग्य तो विचार न केल्याने आम्ही स्वतःपाईप मोरी काढुन सदरचा रस्ता बंद करत आहोत.


 


फोटो ओळ 


रस्ता असा खोदला आहे


छायाः गणेश पवार