बेंचमार्क निर्देशांकांची फ्लॅट कामगिरी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


बेंचमार्क निर्देशांकांची फ्लॅट कामगिरी


 


~ निफ्टीत १०.८५ तर सेन्सेक्समध्ये १८.७५ अंकांची वाढ ~


 


मुंबई, १५ जुलै २०२०: भारतीय निर्देशांकांनी आज वित्तीय, इन्फ्रा सेक्टर्ससह रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये विक्री अनुभवत फ्लॅट व्यापार केला. निफ्टी ०.१०% किंवा १०.८५ अंकांनी वाढला व तो १०,६१८.२० अंकांवर स्थिरावला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.०५% किंवा १८.७५ अंकांनी वाढून ३६,०५१ अंकांवर थांबला.


 


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास १०८३ शेअर्सनी नफा कमावला, १५०३ शेअर्स घसरले तर १५६ शेअर्स स्थिर राहिले. विप्रो (१६.८९%), इन्फोसिस (६.४७%), एचसीएल टेक (४.६७%), टेक महिंद्रा (२.७९%) आणि टीसीएस (२.७२%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर रिलायन्स इंडस्ट्रीज (३.८९%), भारती एअरटेल (३.६२%), झी एंटरटेनमेंट (२.९५%), गेल (२.०७%) आणि भारती इन्फ्राटेल (२.०४%) हे निफ्टीतील टॉप लूझर्समध्ये समाविष्ट झाले. आयटी, फार्मा, एफएमसीजी आणि ऑटो स्टॉक्सनी खरेदी अनुभवली तर इन्फ्रा आणि पीएसयू बँकेने निचांकी व्यापार केला. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅपने काहीसा घसरता व्यापार केला.


 


आरआयएल: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत घोषित केले की, कोव्हिड-१९मधील अनिश्चिततेमुळे सौदी अरामकोसोबतच्या करार प्रक्रियेत विलंब होत आहे. तसेच रिलायन्स जिओने भारतात नव्या स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टिमसाठी गूगलशी भागीदारी केली. गूगल इंडिया रिलायन्स जिओ प्लॅटफॉमवर ७.७% स्टेकसाठी ३३,७३७ कोटी रुपये गुंतवणार आहे. या बैठकीत फाईव्ह जी स्पेक्ट्रम आणि जिओ ग्लासच्या लाँचिंगचीदेखील घोषणा झाली. तथापि कंपनीचे स्टॉक्स ३.८९% नी घसरले व त्यांनी १८४२ रुपयांवर व्यापार केला.


 


विप्रो लिमिटेड: जूनच्या तिमाहीत विप्रो लिमिटेडच्या महसूलात ७.५% नी घसरण झाली. तरीही विप्रोचे स्टॉक्स १६.८९ % नी वाढले व त्यांनी २६३.०० रुपयांवर व्यापार केला. कंपनीने १९% चे मजबूत ऑपरेटिंग मार्जिन नोंदवले आहे. पुढील तिमाहीत हेच मार्जिन ठेवण्याची आशा आहे.


 


 


 


भारतीय रुपयाने देशांतर्गत इक्विटी बाजारात खरेदी अनुभवली. त्यामुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७५.१४ रुपयांचे मूल्य निर्धारीत केले.


 


कोरोनावरील लसीबद्दल वाढत्या आशेमुळे आशियाई तसेेच युरोपियन बाजारासह जागतिक बाजारपेठेत आज सकारात्मक व्यापार दिसून आला. नॅसडॅकचे शेअर्स ०.९४%, एफटीएसई एमआयबीचे शेअर्स २.०२%, एफटीएसई १०० चे शेअर्स १.७९ टक्क्यांनी वाढले. तर निक्केई २२५ चे शेअर्स १.५९% व हँगसेंग कंपनीचे शेअर्स ०.०१% नी वाढले.