ओरिफ्लेमने लॉन्च केले 'फील गुड शॉवर जेल

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


'


मुंबई, :- २७ जुलै २०२०: ओरिफ्लेम या अग्रगण्य थेट विक्री करणाऱ्या स्विडिश ब्युटी ब्रँड, तुम्हाला केवळ सुंदर दिसण्यासाठीच नव्हे तर सुंदर अनुभव मिळण्याकरिताही उत्पादने निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे. पवित्र सौंदर्यावरील विश्वास अधिक दृढ करीत, ब्रँडने फील गुड शॉवर जेल्स लाँच केले आहे. संकेतात्मक शॉवर जेल्समध्ये विशिष्ट मूड किंवा भावना जागृत करण्यासाठी ओळखले जाणारे तेल आणि घटक समाविष्ट केले आहेत. हे शॉवर जेल्स चिल आउट आणि बी हॅपी या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.


चिल आउट शॉवर जेलमध्ये आरामदायीपणासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जाणाऱ्या लव्हेंडर ही सुवासिक वनस्पती तसेच कामुक, जमिनीशी जुळलेला आणि मधुर सुगंध असलेल्या देवदार वृक्षांच्या लाकडाचे घटक एकत्रित करण्यात आले आहेत. स्वच्छता आणि शांततेचा परिणाम देणारे चिल आउट शॉवर जेल हे तुम्हाला आरामदायक आणि विश्रांतीचा अनुभव देते. जेणेकरून तुमच्या व्यग्र दिनक्रमाची सुरुवात उत्तम होते.


स्वच्छता देणारे व ताजेतवाने करणारे बी हॅपी शॉवर जेल हे त्यातील तत्काळ मूड सुधारणा-या सेंटमुळे तुम्हाला भरपूर वेळ हसरे ठेवेल. रक्त नारंगी रंगाच्या अति रसदार सुगंधाने पुरेपुर अससलेल्या या जेलद्वारे तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही वाटते. हळदीची सोनेरी आणि आनंदी चमक देणाऱ्या या शॉवरजेलमुळे उन्हाळ्यातही तुमचा मूड अखेरपर्यंत ताजा राहतो.


ओरिफ्लेम साउथ एशियाचे सिनिअर डायरेक्टर, रिजनल मार्केटिंग श्री नवीन आनंद म्हणाले, “ओरिफ्लेमच्या फील गुड शॉवर जेलद्वारे आम्ही हा मूड पकडून ठेवण्याचा तसेच त्याची क्षमता वाढवण्यासाठी तुमची मदत करत आहोत. त्वचेला हळूवारपणे स्वच्छ करत चिल आउट शॉवर जेल हे तुम्हाला आरामदायी बनवते. तसेच बी हॅपी जेलद्वारे तुम्हाला प्रफुल्लित आणि ताजेतवाने वाटते. त्यामुळे तुमच्या भावना दिवसेंदिवस अधिक खुलवण्यासाठी तुम्ही फील गुड उत्पादने निवडू शकता.”


Popular posts
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image