पुणे कलेक्टरकडून सूचना* शीर्षकाखालील संदेश चुकीचा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*


 


 पुणे, दि.2- जिल्ह्यातील काही व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘पुणे कलेक्टरकडून सूचना’ या शीर्षकाखाली लॉकडाऊनबाबत सूचना देणारा संदेश फॉरवर्ड करण्यात येत आहे. या संदेशात वृत्तपत्र बंद करा, शेजाऱ्यांशी संवाद बंद, बेकरी सामान बंद आदी दिशाभूल करणाऱ्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.


असा कोणताही संदेश पुणे जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. हा संदेश नागरिकांमध्ये गैरसमज पसरविणारा असून नागरिकांनी असा संदेश कोणालाही फॉरवर्ड करू नये. कोणी फॉरवर्ड करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. प्रशासनाने दिलेल्या अधिकृत सूचना जिल्हा माहिती कार्यालयाच्या ट्विटर हँडल @Info_Pune वर वेळोवेळी देण्यात येतात, तसेच वृत्तपत्रांमधून प्रकाशित करण्यासाठी पाठविण्यात येतात, असे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी कळविले आहे.


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image