*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*पिंपरी, दि. 22* – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागात अनेक वर्षांपासून मानधनावर कार्यरत असलेल्या स्टाफनर्स तसेच आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या घंटागाडी कर्मचार्यांना तात्काळ महापालिका सेवेत तात्काळ कायम करावे, अन्यथा या कर्मचार्यांमध्ये करोनासारख्या महामारीच्या काळात उद्रेक होईल, असा इशारा उपमहापौर तुषार हिंगे यांनी दिला आहे.
याबाबत हिंगे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लेखी निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, महापालिकेच्या वैद्यकीय विभागात अनेक स्टाफनर्स या मानधनावर कार्यरत आहेत. सध्या महापालिकेत नर्सचा तुटवडा आहे. या कालावधीत आपण इतर ठिकाणाहून मोठ-मोठ्या पगारावर स्टाफनर्स उपलब्ध करून घेत आहोत. मात्र अनेक वर्षांपासून तसेच करोनाच्या काळात जीव धोक्यात घालून प्रामाणिकपणे काम करत असलेल्या महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील स्टाफनर्सकडे दूर्लक्ष केले जात आहे. या स्टाफनर्समध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली असून त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. या नाराजीचे रुपांतर उद्रेकामध्ये होण्याची भिती आहे.
तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागात मानधनावर अनेक वर्षांपासून घंटागाडी कर्मचारी काम करत आहेत. ते देखील आपला जीव धोक्यात घालून करोना सारख्या महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. या कर्मचार्यांना कायम करावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे. मानधनावर काम करणार्या कर्मचार्याचा मृत्यू झाल्यास महापालिकेकडून त्यांना कोणतीही मदत मिळत नाही. त्यामुळे या कर्मचार्यांमध्येदेखील उद्रेक होण्याची भिती आहे. करोनासारख्या महामारीमध्ये या कर्मचार्यांनी वेगळी भूमिका घेतल्यास महापालिकेसमोरील अडचणी वाढू शकता. तसेच त्याला केवळ प्रशासन जबाबदार राहिल. या बाबींचा विचार करून स्टाफनर्स व घंटागाडी कर्मचार्यांना तात्काळ कायम करावे, अशी मागणी उपमहापौर तृषार हिंगे यांनी ही मागणी करीत, पुन्हा एकदा घंटागाडी यांचा प्रश्न ऐरणीवर आणित, या मागणीला पाठिंबा देत. घंटागाडी कर्मचारी यांच्यात नवी उर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न उपमहापौर तृषार हिंगे यांनी केल्यांची चर्चा दिवसभर पिंपरी चिंचवड शहरात होती.