*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*पदवीधर नोंदणीतील त्रुटी त्वरीत दुर करु - सौरभ राव*
*पुणे :* पदवीधर नोंदणीची प्रक्रिया सुलभ व गतीमान करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना त्वरीत करुन ऑनलाईन नोंदणीला गती दिली जाईल व यातील त्रुटी दूर करण्यासाठी वैयक्तिक रित्या मी लक्ष देईल, असे प्रतीपादन प्रभारी विभागीय आयुक्तश्री. सौरभ राव यांनी केले.
आज भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे पदवीधर नोंदणी प्रमुख मा.राजेश पांडे, माजी सभागृह नेते श्री.श्रीनाथ भिमाले, पुणे शहर नोंदणी प्रमुख डॉ श्रीपाद ढेकणे, नगरसेवक श्री अजय खेडेकर या शिष्टमंडळाने श्री. सौरभ राव यांची भेट घेतली.
सर्व्हर डाउन असणे, पोर्टल बंद राहणे, कागदपत्रे अस्विकृत होणे, कोणत्याही कारणाविना नोंदणी अर्ज नाकारला जाणे इ. समस्या येत असल्याचे निर्दशनास आणू दिले. त्यामुळे या महामारीच्या काळात ऑनलाईन पध्दतीने नोंदणीचा प्रतिसाद वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना त्वरीत करावी, अशी आग्रही मागणी निवेदनाव्दारे शिष्टमंडळानी केली. प्रलंबित राहणा-या अर्जाचे प्रमाण खुप मोठे असल्याने त्याबाबत त्वरीत उपाययोजना करुन हे सर्व अर्ज स्वीकारले जावे अशी मागणी केली.
त्यावेळी झालेल्या चर्चेमध्ये प्रभारी विभागीय आयुक्त श्री. सौरभ राव यांनी वरील आश्वासन
देवून कार्यवाही करण्याची माहिती दिली.