ट्रान्सफार्मर व एमएसएबच्या केबल बंद पडल्यामुळे निम्मे पुणे पाण्याअभावी स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या पुण्यातील भारतीय जनता पार्टीची शोकांतिका - आबा बागुल

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


श्री. आबा बागुल 


गटनेता, काँग्रेस पक्ष ,पुणे महानगरपालिका 


मा. उपमहापौर, पुणे 


नगरसेवक, पुणे महानगरपालिका 


प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस 


 


ट्रान्सफार्मर व एमएसएबच्या केबल बंद पडल्यामुळे निम्मे पुणे पाण्याअभावी 



 


पर्वती जल शुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफार्मर व केबल बंद पडल्यामुळे संपूर्ण दक्षिण पुणे व परिसराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. कोरोनाला नागरिक धीराने तोंड देत असताना अशी आपत्ती येणे हि दुर्दैवी बाब आहे. पुणे स्मार्ट सिटी बनले आहे. असा धिंडोरा पिटत असताना वस्तुस्थिती किती विधारक आहे याचे हे चित्र आहे. पाणी पुरवठा वेळेत सुरु झाला नाही तर नागरिकांनी करायचे काय ? हा प्रश्न अतिशय गंभीर आहे त्यासाठी शहरातील सर्व पंम्पिंग स्टेशनकडे एमएसइबीच्या केबल लाईन दुहेरी असणे अत्यंत गरजेचे आहे. अशा आपत्तीना तोंड देण्यासाठी एमएसीबीच्या दुहेरी केबल टाकण्याची व बॅकअपसाठी येथे जेनरेटरची तरतूद करावी लागेल . यासाठी यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तानी लक्ष घालून अशा आपत्कालीन संकटांना तोंड कसे द्यायचे याची भविष्यात आखणी करावी व अश्या प्रकारे पुणेकरांना आकस्मित संकटांना सामोरे जावे लागू नये पाण्याच्या लाईन बरोबरच सुएज ट्रीटमेंट लाईनला देखील एमएसबीची दुहेरी केबल लाईन असणे गरजेचे आहे. जेणेकरून अश्याप्रकारे संकट आल्यास त्वरित दुसऱ्या लाईनवर टर्न्सफार्मर लगेच सुरु होतील व पुणेकरांना अश्या संकटाना सामोरे जावे लागणार नाही. तसेच पर्वती जलकेंद्रातील बंद पडलेली एमएसइबीची लाईन लवकरात लवकर सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे असे संकट पुन्हा ओढवू नये यासाठी महापौरांनी खबरदारी घ्यावी असे काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल म्हणाले 


अंदाजे ५० लाख लोक संख्येचे पुणे असताना एक एमएसीबी ची लाईन बस्ट झाल्याने अर्ध्या पुण्याचा पाणी पुरवठा बंद होतो. जर १५ दिवस हा संकट ओढवले तर पुणे शहर कोणाच्या भरवश्यावर राहील याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. स्मार्ट सिटी बनवत असताना या सगळ्या गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे असे आबा बागुल शेवटी म्हणाले