*एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारततर्फे एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस -अल्टिमेट रिअ‍ॅलिटी संशोधन संस्थेचा शुभारंभ सामाजिक बांधिलकीतून होईल संशोधन*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कृपया प्रसिद्धीसाठी दि. 8 जून 2020


 


एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारततर्फे


एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस -अल्टिमेट


रिअ‍ॅलिटी संशोधन संस्थेचा शुभारंभ


सामाजिक बांधिलकीतून होईल संशोधन


पुणे,दिः 8 जूनः मानव निर्मित कोरोना व्हायरसमुळे आज लाखों नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. अद्याप त्यावर कोणतेही औषध निर्मिती झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी,पुणे, भारततर्फे ‘ एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस-अल्टिमेट रिअ‍ॅलिटी’ या संशोधन संस्थेचा शुभारंभ करण्यात आला. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा.कराड यांनी आज वेबिनारच्या माध्यमातून दिली.


प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, भारतातील पहिली एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस -अल्टिमेट रिअ‍ॅलिटी या संशोधन संस्थेमध्ये अमेरिकेतील प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. कन्नन रंगरामानुजन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले जाणार आहे. तसेच, संतवृत्तीचे शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे प्रमुख मार्गदर्शक असतील. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जयंत खंदारे हे संचालक असतील. सल्लागार म्हणून एमआयटी स्कूूल ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉ.भानुदास. कुचेकर हे असतील. या संस्थेत संशोधनाबरोबरच अध्यात्मिक चिंतन व औषध निर्मितीवर अधिक भर दिला जाणार आहे.


सामाजिक बांधिलिकीच्या भावनेतून स्थापन केलेल्या या स्कूलमध्ये कोरोना व्हायरस सारख्या संसर्गजन्य रोगांवरील औषधांवर संशोधन केले जाणार आहे. ज्याचा फायदा नक्कीच समाजाला होईल. सध्या या संस्थेत कॅन्सरसारख्या भयानक आजारावरही संशोधन केले जात आहे.


डॉ. कराड म्हणाले, विज्ञानायुगात गुगल, फेसबूक, ट्विटर व इंटरनेटची अप्रतिम प्रगती झालेली असतांनाही हे विश्व चैतन्यस्वरूप, बुध्दिमान व ज्ञानस्वरूप असल्याची प्रचिती होते. शास्त्रीय सिद्धात आणि आध्यात्मिक सिद्धात याचे एकत्रिकरण म्हणजे वैश्विक सिद्धांत होय. अशा अर्थाचे कथन ज्ञानेश्वर माऊली 720 वर्षापूर्वी केले होते. त्याचीच प्रचिती आता जगसमोर येत आहेत. तसेच विज्ञानाचे चिंतन झाल्यानंतर जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. पेन्ड्रोज, डॉ. एर्वीन श्रॉडिंजर व अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या म्हणण्यानुसार विज्ञानाच्या युगात अध्यात्मिक वैश्विक तत्वेच महत्वाची आहेत. या सृष्टीला चालविणारी चैतन्यमय अशी शक्ती आहेत.


भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाच्या आधारावरच या सृष्टीची प्रगती होणार आहे. मानवनिर्मित कोरोना व्हायरसमुळे जगभरातील सर्व मंदिरे, मस्जिद, गुरूद्वार व चर्च यासारखे सर्व धार्मिक स्थळे बंद झालेली आहेत. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या संसर्गजन्य व्हायरसवर वैद्यकशास्त्र, औषध शास्त्र अशावेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करण्याचा तसेच मानवी जीवन अधिक सुखकर करण्याचा या संस्थेचा मानस आहे.


 


 


जनसंपर्क विभाग,


माईर्स एमआयटी, पुणे