'फ्लो' पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदी डॉ. अनिता सणस

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


  


पुणे, दि. १६ मे २०२० : 'फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन' (फ्लो) पुणे चॅप्टरच्या २०२०-२१ या कालावधीसाठी डॉ. अनिता सणस यांची ६ व्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पहिल्यांदाच डिजिटल व्यासपीठावरून 'फ्लो'च्या अध्यक्ष बदलाचा निर्णय घेतला असून हा निर्णय नवी दिल्लीच्या मुख्य कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आहे. सणस यांनी मावळत्या अध्यक्षा रितू छाब्रिया यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.


 


या वेबिनारला माजी अध्यक्षा हरजिंदर तलवार, राष्ट्रीय अध्यक्ष जानबी पूखन, पुणे चॅप्टरचे सदस्य आणि देशभरातील फ्लो सदस्य उपस्थित होते. सणस यांनी २०१७-१८,२०१८-१९ या काळात फ्लोच्या कोषाध्यक्षा म्हणून काम पहिले होते. तसेच त्या २०१९-२० या काळात वरिष्ठ उपाध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या.


 


यावेळी सणस म्हणाल्या, "'शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्यटन' हा फ्लोचा राष्ट्रीय दृष्टीकोन आहे. त्यालाच जोडून महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू आणणे हे माझे या वर्षाचे ध्येय आहे. यासाठी विविध कौशल्ये, प्रशिक्षण देणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे यासाठी माझ्या काही योजना आहेत. त्याचदृष्टीने समाज आही फ्लो सभासदांसाठी काही कार्यशाळा आयोजित करणार आहोत. या बिकट काळात आम्ही काही संकल्पनांवर आधारित वेबिनार घेऊन आमच्या सदस्यांना प्रशिक्षण देणार आहोत. यातील पहिली संकल्पना 'काळाची गरज ओळखून व्यावसायिक धोरणांमधील बदल' ही असणार आहे. आता सगळ्यांना चौकटी बाहेर पडून विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी मी शिक्षण, मनोरंजन, फॅशन, बँकिंग, डिजिटल मार्केटिंग, उत्पादन, बांधकाम आदि विविध क्षेत्रातील तज्ञांना या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करणार आहे. जेणे करून व्यवसायाला नवे स्वरूप कसे प्राप्त करता येईल याविषयी मार्गदर्शन मिळेल."


 


सणस यांनी मार्केटिंग मध्ये पदव्युत्तर पदवी मिळविली असून 'अल्टरनेटिव्ह हीलिंग' या विषयात पीएचडी केली आहे. त्यांचे स्वतःचे 'हीलिंग सेंटर' असून त्यांच्या पतीच्या बांधकाम व्यवसायात त्या भागीदार आहेत. वाचन, संगीत, गायन यात त्यांना विशेष रुची आहे.


 


माजी महापौर बाबुराव सणस हे पुण्याचे पाहिले महापौर होते, हे औचित्य साधत डॉ. अनिता सणस यांच्या पहिल्या सत्राचे उदघाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते  झाले ते 'जगाला विळखा घालून बसलेल्या कोविड १९ च्या साथीचा पुण्यावर झालेला परिणाम' या विषयावर मार्गदर्शन केले . हा डिजिटल कार्यक्रम दि. १८ मे रोजी दुपारी १२ वाजता झाला असून उषा पूनावाला यावेळी अध्यक्षस्थानी होत्या.


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
मा श्री. विनय सुदामपंत शेलुर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना कोविड १९ महायोद्धा 2020 (KOVID 19 WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Image
मा.श्री.शादाब मुलाणी युवासेना पुणे यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन