भाजपकडून विलास मडिगेरी यांच्या जीवाला धोका : संजोग वाघेरे पाटील यांचा आरोप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


प्रेसनोट....



 


पिंपरी (प्रतिनिधी) दि. ४ जून


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या कार्यालयात १ जून रोजी जो प्रकार घडला की स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून घडवून आणली आहे. हा संपूर्ण घटना पाहता यातून जाणिवपूर्वक आणि मोठ्या कटाचा एक भाग असल्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चेतून समोर येत आहे. वस्तुत: किरकोळ वादावादी झालेली असतानाही त्याला भारतीय जनता पक्षाकडून जाणिवपूर्वक मोठे स्वरुप देण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे शहरातील सर्वसामान्य जनतेमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे. राहूल कलाटे ( शिवसेना) व मयूर कलाटे हे राष्ट्रवादीचे तरुण लोकप्रतिनिधी आहेत त्यांना उज्ज्वल भविष्य आहे. भाजपचे चिंचवडमधील लोकप्रतिनिधी राहूल कलाटे व मयूर कलाटे यांना राजकारणातून संपवण्यासाठी विलास मडिगेरी याना संपविण्याचा घाट रचला जात आहे असा आमचा संशय आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केला आहे.


भाजपचे नगरसेवक विलास मडिगेरी हे स्थायी समितीचे सदस्य नसतानाही ते मंगळवारी राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे व शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे हे ज्या ठिकाणी बसले होते त्याठिकाणी विनाकारण गेले. त्यांनी हे दोघे या ठिकाणाहून निघून जात असताना मडिगेरी यांनी त्यांना जाणिवपूर्वक भांडणे करण्यास प्रवृत्त करून कॉलर पकडून अरेरावीची भाषा करत भांडणास सुरुवात केली. यावेळी अत्यंत छोटासा वादविवाद झाला असतानाही मडिगेरी हे नाटकी आव आणत पहिल्यांदा वायसीएम व त्यानंतर बिर्ला हॉस्पीटमध्ये ॲडमीट झाले. गेल्या दोन दिवसांपासून ते त्या ठिकाणी ॲडमीट आहेत. किरकोळ वादावादी झाली असतानाही त्याला भारतीय जनता पक्षाकडून जाणिवपूर्वक राजकीय स्वरुप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता दवाखान्यात विलास मडिगेरी यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्यांना पोलिस संरक्षण मिळावे असे मागणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे.


हे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते नाना काटे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, दत्ता साने, राजू मिसाळ व शिवसेनेचे नगरसेवक अमित गावडे यांच्या स्वाक्षरीने पोलीस आयुक्तांना दिले आहे. तसेच राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला अडचणीत आणून राष्ट्रवादी आणि शिवसेनेला बदनाम करण्याचेदेखील या संपूर्ण प्रकारामागे षडयंत्र असू शकते. भाजपाचे स्थानिक पातळीवरील नेते धूर्त आणि षडयंत्र ऱचण्यात माहिर असल्यामुळे आपण विलास मडिगेरी यांना पोलीस बंदोबस्त देऊन मडिगेरी हे नाटक करून रुग्णालयात दाखल आहेत की या मागे भाजपाच्या नेत्यांचे षडयंत्र आहे याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अशी मागणीही पोलीस आयुुुक्त  यांंच्याकडे केली आहे असे वाघेरे यांनी  म्हटले आहे.