दगडूशेठ गणपती' मंदिर शासन आदेशानुसार ३० जून पर्यंत बंद

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


-


श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; भाविकांनी आॅनलाईन दर्शन घेण्याचे आवाहन


 


पुणे : सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यामध्ये देखील रुग्णसंख्येत भर पडत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक ठिकाणे व मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर शासन आदेशाप्रमाणे ३० जून पर्यंत बंद राहणार आहे. 


 


केंद्र सरकारने दिलेल्या नियमावलीनुसार इतर राज्यांतील काही सार्वजनिक ठिकाणे व मंदिरे दिनांक ८ जून पासून खुली होत असली, तरीही महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राज्यातील मंदिरे ३० जून पर्यंत बंद आहेत. त्यानुसार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने देखील जून अखेरपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 


 


दिनांक ८ जून रोजी संकष्टी चतुर्थी असल्याने मंदिर खुले होणार असा भाविकांचा समज होऊ नये, यासाठी दगडूशेठ मंदिर बंदच असून गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात येत असल्याचे ट्रस्टतर्फे कळविण्यात आले आहे. परिस्थितीनुसार शासनातर्फे पुढील नियमावली आल्यानंतर जुलै महिन्यात पुढील निर्णय ट्रस्टतर्फे घेण्यात येणार आहे.  


 


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भाविकांनी मंदिरात गर्दी करुन प्रत्यक्ष दर्शन घेण्याऐवजी आॅनलाईन दर्शन घ्यावे. ट्रस्टचे संकेतस्थळ www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App


Android: http://bit.ly/Dagdusheth_Android_App या फेसबुक, ट्विटर, यु टयूब आणि अ‍ॅप येथे श्रीं चे आॅनलाईन दर्शन घ्यावे. गर्दीमध्ये न मिसळता कोरोनाची भीषणता संपेपर्यंत भाविकांनी मंदिर परिसरात देखील येण्याचे टाळावे, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.