मागणी वाढण्याच्या आशेने कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


मुंबई, ९ जून २०२०: विविध देशांनी विषाणूसंबंधी अडथळे दूर केल्याने मागणीतील वाढीच्या आशेने कच्च्या तेलाच्या दरात सोमवारी ३.४ टक्क्यांची घट होऊन ते ३८.२ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. किंगडम आणि आखाती देशांचे सहकारी कुवैत तसेच संयुक्त अरब अमिरातीनी जुलै २०२० मध्ये आपले उत्पादन दररोज १.१८ दशलक्ष बॅरलने कमी करण्यास नकार दिला. 


 


मागील आठवड्यात, ओपेक आणि रशियाने जुलै २०२० च्या अखेरपर्यंत उत्पादनातील कपात कायम ठेवण्याचे जाहीर केल्यानंतर तेलाच्या किंमती वाढल्या होत्या. ही कपात मर्यादित राहिली. कारण ओपेक आणि त्यातील सदस्य राष्ट्रांनी महिनाभर दररोज ९.७ दशलक्ष बॅरल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला. लिबियाच्या नॅशनल ऑइल कॉर्पोरेशनने सोमवारी उत्पादन प्रक्रिया पुन्हा सुरू केल्यानंतर दोन आठवडे संपूर्ण क्षमतेने ती सुरू ठेवण्याचा संकल्प केला आहे.


 


अमेरिकी फेडरल रिझर्व्हने अमेरिकी डॉलरवर लक्ष केंद्रीत केल्याने इतर चलनधारकांना सोन्याचे दर स्वस्त झाले. त्यामुळे सोमवारी स्पॉट गोल्डवरील सोन्याचे दर ०.५६ टक्क्यांनी वाढले. शुक्रवारी, अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून चलनविषयक धोरण शिथिल होण्याच्या वाढत्या अपेक्षांमुळे सोन्याच्या किंमती २ टक्क्यांनी घटल्या. मागील आठवड्यात, अमेरिकेने मे २०२० मध्ये बेरोजगारीत लक्षणीय संख्येने घट झाल्याचे सांगितले. त्यामुळे गुंतवणूकदार जोखिमीच्या मालमत्तेकडे ओढले गेले. त्यामुळे सोन्याची मागणी कमी झाली.


 


सोमवारी, स्पॉट सिल्व्हरच्या किंमती २.८ टक्क्यांनी घसरून १७.९ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. एमसीएक्सवरील दर १.७६ टक्क्यांनी वाढून ४८,१८५ रुपये प्रति किलोवर आले.