युनियन बँक ऑफ इंडियाची व्याजदर कपात

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


'ईबीएलआर'मध्ये ४० बेस पॉईंटची कपात; किरकोळ, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना होणार फायदा   


 


मुंबई, १ जून २०२०: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) धोरणात्मक व्याजदरात कपात केल्यानंतर युनियन बँक ऑफ इंडियानेही रेपो आधारित कर्ज दरामध्ये कपात केली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (ईबीएलआर)मध्ये ४० बेस पॉईंट म्हणजेच ०.४० टक्क्यांची कपात केली असून नवीन दर ६.८० टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. नवीन दर सोमवार १ जून २०२० पासून अंमलात येणार असल्याची माहिती बँकेने दिली. विविध योजनांचे प्रभावी दर उत्पादनाच्या ईबीएलआर अधिक प्रीमियम सवलतीत असतील.


 


आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार किरकोळ आणि सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना असलेल्या नव्या दराच्या कर्जासाठी युनियन बँक ऑफ इंडिया ईबीएलआर आधारित व्याज दर ऑफर करते. अशा प्रकारे १ ऑक्टोबर २०१९ पासून या क्षेत्रांना लागू झालेले सर्व फ्लोटिंग रेट लोन्स हे आरबीआय पॉलिसी रेटशी जोडलेली आहेत. १ एप्रिल २०२० पासून मध्यम उद्योगांना आरबीआयच्या पॉलिसी रेटशीदेखील जोडले गेले आहे.


Popular posts
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
झीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*
BLaCK PAPPER PANT*💕💕💕
Image
मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली...
Image
राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!........... दिवस_ 33...             दिनांक 1/5/2020
Image