माधव रसायन' व 'रस माधव वटी'चे विश्ववती चिकित्सालयातर्फे लोकार्पण

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


 


पुणे : श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि संशोधन केंद्रातर्फे 'माधव रसायन' आणि 'रस माधव वटी' या विषाणू-जिवाणू प्रतिरोधक क्षमता निर्माण करू शकणाऱ्या औषधांचे लोकार्पण ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर, संशोधन केंद्राचे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर यांच्या प्रेरणेने, पुण्यातील प्रथितयश वैद्य समीर जमदग्नी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी वैद्य जमदग्नी यांचे 'आयुर्वेद आणि साथीचे आजार' यावर फेसबुक लाईव्हद्वारे व्याख्यानही झाले. 


 


वैद्य जमदग्नी म्हणाले, "सध्याच्या कोविड साथीच्या बिकट प्रसंगी आयुर्वेदिक औषधे प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. आयुर्वेदीय दिनचर्या, आहार, विहार यांचे पालन करण्याबरोबरच मनोधैर्य वाढवण्यासाठी आयुर्वेद उपयोगी आहे. राज्य सरकारनेही आता कोविडवरील आयुर्वेदीय उपचारांना परवानगी दिली असल्याने लोकांनी यावर वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा."


 


आयुर्वेदातील ज्या वनस्पती विषाणूजन्य आजारावर उपयुक्त असलेल्या आणि प्रतिकार क्षमता वाढवणाऱ्या वनस्पतींपासून या औषधाची निर्मिती केली गेली आहे. वैद्य समीर जमदग्नी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रसाद पांडकर, डॉ शैलेश मालेकर, डॉ गिरीश शिर्के, डॉ तुषार सौंदाणकर, डॉ सागर कवारे, डॉ राहुल शेलार यांच्याकडून या औषधाची निर्मिती झाली आहे.


 


श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टतर्फे पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर आदी शहरांमध्ये अत्यावश्यक सेवेतील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना या काळात 'माधव रसायन' व 'रस माधव वटी' निःशुल्क पुरवली आहे. सर्दी, खोकला, अंगदुखी, थकवा, वास किंवा चव जाणे, कफ आदी लक्षणांमध्ये ही औषधे उपयुक्त ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे.


 


डॉ गिरीश शिर्के यांनी ट्रस्ट आणि संशोधन केंद्राबद्दल, तर डॉ पांडकर यांनी आयुर्वेदातील संशोधनाबद्दल माहिती दिली. डॉ तुषार सौंदनकर यांनी आभार मानले. प्रसंगी डॉ नवीन पाटील, डॉ तुषार सुकळीकर, डॉ देवदत्त जोशी, डॉ अभय जमदग्नी, डॉ शुभम धूत, डॉ विनय सचदेव आदी उपस्थित होते.


------------------------


 


Photo Caption:


 


विश्ववती चिकित्सालयातर्फे 'माधव रसायन' व 'रस माधव वटी'चे लोकार्पण करताना वैद्य समीर जमदग्नी.


Popular posts
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image