*डी-मार्ट मध्ये चिनी वस्तूंची विक्री तात्काळ थांबवणे बाबत शिवसेना काळेवाडी तर्फे निवेदन*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल प्रति,


मा. संपादक,


सुप्रसिद्ध न्यु पोर्टल


 


*कृपया प्रसिद्धीसाठी !*


  


चीनच्या सैन्याने आपल्या देशाच्या हद्दीत शिरून लष्करी जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात वीस जवान शहीद झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून शहिदांना आदरांजली वाहण्याचा निर्धार केला आहे.


 


आपल्या देशातील गलवान खोऱ्यात चीनच्या सैनिकांनी भारतीय जवानांवर हा हल्ला झाला होता. या घटनेचा देशभरातून प्रखरपणे निषेध होत असून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जात आहे. या परिस्थितीत डी- मार्ट काळेवाडी येथे चिनी वस्तू विकल्या जात आहेत असे शिवसेना काळेवाडी शाखेच्या निदर्शनास आले आणि २२- जून-२०२० रोजी पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने तात्काळ संबंधित मॅनेजमेंट ची भेट घेऊन हे निवेदन दिले आहे. 


 


या वस्तू विकणे म्हणजे आपल्या शहिदांचा अवमान आहे आणि चीनला पुन्हा आपल्या वीर जवानांना वर भ्याड हल्ला करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासारखे आहे असे *शिवसेना चिंचवड विधानसभा संघटक श्री. हरेश नखाते* बोलताना म्हणाले.


 


या निवेदनामार्फत त्यांनी चिनी वस्तू न विकण्याची विनंती केली आहे तसेच शहरातही कोणत्याही व्यापारी आस्थापनांनी चिनी मालाची विक्री चालू ठेवल्यास त्या व्यापाऱ्यालाच सर्व जनतेला सोबत घेऊन बहिष्कृत करण्यात येईल असा इशारा *श्री. नरसिंग माने शिवसेना शाखाप्रमुख* यांनी दिला.


 


यावेळी शिष्टमंडळात शिवसेना काळेवाडी विभागप्रमुख श्री. गोरख पाटील, रहाटणी विभागप्रमुख श्री. प्रदीप दळवी, दत्ता गिरी, गणेश वाळुंज आदी शिवसैनिक उपस्थित होते.


 


अधिक माहितीसाठी संपर्क: 


*श्री. नरसिंग विठ्ठलराव माने*


*शिवसेना काळेवाडी शाखाप्रमुख*