बारामती मध्ये पोलीस आणि वकिलांची हाणामारी ;न्यायालयाच्या परिसरात घटना....*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*बारामती मध्ये पोलीस आणि वकिलांची हाणामारी ;न्यायालयाच्या परिसरात घटना....*


पुणे - बारामती मध्ये पोलिस आणि वकिलांची तुफान मारामारी. पोलीस उपाधीक्षक नारायण शिरगावकर सह पोलिसांना जोरदार मारहाण झाली.त्यानंतर पोलिसांनी ही केला लाठीचार्ज.  


बारामतीत काल संध्याकाळी एका वकिलासह नाना सातव आणि अन्य कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या न्यायालयीन कामासाठी त्यांना कोर्टात हजर केले तेव्हा. एक पोलीस कर्मचारी व्हिडिओ शूटिंग करत होता. त्याला वकिलांनी अटकाव केला.कोर्टाच्या आवारात बेकायदा शूटिंग करू नका असे सांगितले यावर पोलीस कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा केली. 


त्यानंतर उपविभगायीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर तेथे हजर झाले. त्यानंतर वकील राजेंद्र काळे, नितीन भामे व इतर वकिलांची शिरगावकर यांच्याबरोबर शिवीगाळ झाली. झालेल्या बाचाबाची नंतर त्याचे पर्यावसन हाणामारीमध्ये झाले आणि दोन्ही बाजूने तुफान मारामारी झाली.


पोलिसांनी काही वकिलांना ताब्यात घेतले असून अद्याप त्यांच्यावर काय कारवाई झाली हे समजले नाही. मात्र या प्रकारानंतर वकील संघटना प्रचंड आक्रमक झाल्या असून पोलीस कायद्याचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे.


दरम्यान पोलीस उपाधीक्षक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे वकील संघटना यांचेकडून बोलले जात आहे.


Popular posts
तरुणांनी राज्यशासन व केंद्राच्या योजनेचा लाभ घेवून उद्योजक बनावे – पी.टी काळे
Image
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय
Image
साहेब मी एक  साधा  पत्रकार आहे..* कर्जत माथेरान नेरळ   :  गणेश पवार दै.शिवतेज✍️
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image