परराज्यात अथवा परजिल्ह्यात जाण्यासाठी इच्छुकांनी वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी दवाखान्यात गर्दी करु नये* *जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*परराज्यात अथवा परजिल्ह्यात जाण्यासाठी इच्छुकांनी वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी दवाखान्यात गर्दी करु नये*


*जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन*


पुणे, दि.४: दवाखान्यांमध्ये कोरोना लक्षणांचे रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. त्यामुळे आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी पर राज्यात जायला इच्छुक कामगार अथवा परजिल्ह्यात जायला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थी, कामगार, नागरिकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी दवाखान्यात गर्दी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे. शिवाय परराज्यात 100 अथवा 200 अशा संख्येत गटाने जाणाऱ्या कामगारांची त्यांच्या नजीकच्या ठिकाणी प्रशासनामार्फत वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. राम यांनी म्हटले आहे.


पुणे आणि पिंपरी चिंचवड  महानगरपालिका तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळून पुणे जिल्ह्यातील सर्व उद्योग, कारखाने, औद्योगिक आस्थापना सुरु करण्यात येणार आहेत, तसेच या भागातील बांधकामे सुरु होत आहेत. त्यामुळे याठिकाणी कामगारांना सोशल डिस्टनसिंग ठेवून काम सुरु करता येणार आहे. शिवाय सध्याच्या परिस्थितीत घरभाडे आकारू नये, अशा सूचना घरमालकांना देण्यात आल्या आहेत. 


कामगार ज्या राज्यात जाणार आहेत, त्या संबंधित राज्याची परवानगी मिळाल्यानंतरच त्यांना इच्छित स्थळी जायची परवानगी देण्यात येणार आहे. या नागरिकांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर शासकीय निकषानुसार त्यांना परवानगी मिळेल, असेही जिल्हाधिकारी श्री. राम यांनी म्हटले आहे.


0000


Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा*                                        - उपमुख्यमंत्री अजित पवार   * पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
Image