महिला व बालकल्याण विभागाचे सखी अभियान

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


            मुली वयात येत असताना वयाच्या विशिष्ट टप्प्यावर स्त्री धर्मानुसार मुर्लीना मासिक पाळी येते. या शारीरिक बदलामुळे मुली अबोल व अस्वस्थ होतात. मासिक पाळीच्या कालावधीमध्ये मुलींचा दृष्टिकोन संकुचित होतो. शिक्षणाचा अभाव, आरोग्‍यविषयक अपुरी माहिती व स्वच्छतेचा अभाव, स्वच्छतेच्‍या अपुऱ्या सुविधा यामुळे हा दृष्टि‍कोन निर्माण झालेला आहे. परिणामी लक्षावधी महिला व मुली मासिक पाळीच्या कालावधीमध्ये पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही.


 


            या पार्श्वभूमीवर जागतिक स्‍तरावर ‘मासिक पाळी स्वच्छता दिवस’ ही संकल्पना उदयास आली. ‘मासिक पाळी’ या विषयावर जनजागृती निर्माण करणे व या विषयाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टि‍कोन बदलणे, समाजातील विविध घटकांना ‘मासिक पाळी’ या विषयावर बोलते करणे हा या मासिक पाळी स्वच्छता दिवसाचा उद्देश आहे. मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्था, समाजमाध्यमे यांना एकत्र आणून महिला व मुलींसाठी मासिक पाळीच्या स्वच्छता व्यवस्थापनास प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम आखले जातात.


 


            मासिक पाळी स्वच्छता दिवसाची सुरुवात प्रथम जर्मनीमध्ये ‘वॉश युनायटेड’ या संस्थेने दिनांक २८ मे २०१४ मध्ये केली. तेव्हापासून २८ मे हा जागतिक स्तरावर मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. या मासिक पाळी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून पुणे जिल्हा परिषदेने एक नावीन्‍यपूर्ण उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील इयत्ता ८ वी ते १० वी मधील मुली तसेच १४ ते १६ वयोगटातील शालाबाह्य मुलींना सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा केला जाणार आहे.


 


            किशोरवयीन मुलींना मासिक पाळीमध्ये घेतल्या जाणाऱ्या स्वच्छतेचे महत्त्व आणि सॅनिटरी पॅडच्या वापराबाबत सवय निर्माण करणे व त्या अनुषंगाने मार्गदर्शन करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे.


 


            पुणे जिल्‍हा परिषदेच्‍या महिला व बालकल्याण विभागाच्‍यावतीने सन २०२०-२१ मध्ये ग्रामीण भागातील महिला व मुलींसाठी पुढीलप्रमाणे योजना राबविण्‍यात येत आहेत.


 


            1) इयत्‍ता ७ वी ते १२ वी पास मुलींना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संगणक प्रशिक्षणासाठी रक्‍कम रु. ३५००/- पर्यंत अनुदान 2) इयत्ता १२ वी मध्ये 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त गुण मिळविलेल्या (विशेष प्रावीण्य मिळवलेल्या) मुर्लीना पुढील शिक्षणासाठी पुण्यश्‍लोक अहल्याबाई होळकर आर्थिक मदत रक्कम रु. ५०००/ पर्यंत अनुदान ३) आदिवासी व दुर्गम भागातील मुलींना इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंत तालुक्याच्या ठिकाणी शिकण्यासाठी अर्थसहाय्य करणे 4) ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी च्या मुलींना सायकलसाठी रक्कम रुपये ४५००/- पर्यंत अनुदान देणे 5) ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायाभिमुख व जीवनाश्यक वस्तू खरेदी करिता अनुदान देणे (पीठ गिरणी रक्कम रु. १२०००/- पर्यंत, शिलाई मशीन इ. रक्कम रु.७५००/- पर्यंत), 6) ग्रामीण भागातील महिलांना घरकुल दुरुस्तीसाठी रक्कम रु. ५०,०००/- पर्यंत अनुदान देणे. या सर्व योजनांसाठी पुणे जिल्‍ह्यातील अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय, पंचायत समिती कार्यालय येथे संपर्क साधावा.


 


            एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत शून्‍य ते 6 वर्षे वयोगटातील बालके, गरोदर व स्तनदा माता यांना 1) अनौपचारिक शाळा पूर्व शिक्षण 2) पूरक पोषण आहार 3) लसीकरण 4) आरोग्य तपासणी 5) संदर्भसेवा 6) आहार व आरोग्य शिक्षण या सेवा गावातील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये दिल्या जातात.


 


            राज्‍यातील महिला व बाल विकासाच्‍या योजनांची योग्‍य अंमलबजावणी व्‍हावी यासाठी महिला व बाल विकास विभागाच्‍या मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांच्‍या मार्गदर्शनाखाली काम चालू आहे. पुणे जिल्‍हा परिषदेच्‍या योजनांची अंमलबजावणी अध्‍यक्षा निर्मला पानसरे, महिला व बालकल्‍याण विभागाच्‍या सभापती पूजा पारगे यांच्‍या मार्गदर्शनाखाली यशस्‍वीपणे सुरु आहे.


 


            पुणे जिल्‍ह्यात महिला सुरक्षा दक्षता समिती कार्यरत आहे. त्‍यांच्या मदतीसाठी शासन यंत्रणेचे संपर्क क्रमांक उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहेत. पुणे जिल्ह्यातील तालुका संरक्षण अधिकाऱ्याचे नाव व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे- आंबेगाव- अच्युत शेवाळे (9623693787), बारामती- मनिषा जाधव (9404221070), भोर- मयूर भुमकर (8796512326), दौंड- राजश्री खंदारे (7774056692), हवेली - भाग्यश्री घाडगे (8149873494), इंदापूर- शेखर बंडगर (9762108429), जुन्नर-अक्षय साळुंके (9175988969), खेड- प्रवीण नेहरकर (8855088782), मावळ- नूतन देवकर (9822959605), मुळशी- पद्माकर सुरसे (8149468579), पुरंदर-कविता चौरे (9503767478), शिरुर- युवराज गाढवे (9689799696) आणि वेल्हा- नितीन मोरे (9096210652)


 


            पुणे जिल्ह्यातील उपविभागीय सरंक्षण अधिकाऱ्यांची (उप विभागीय पोलीस अधिकारी) नावे पुढील प्रमाणे- बारामती विभाग- नारायण शिवरगावकर (9527513100, 02112-223630), दौंड विभाग- ऐश्वर्या शर्मा (9691981081, 02117-262333), भोर विभाग -अण्णासाहेब जाधव- (9922712100, 02115-223180), हवेली विभाग- सई भोरे पाटील (9421972522, 020-25658035), खेड विभाग- गजानन टोम्पे-(9545555505, 02135-222013), जुन्नर विभाग- दिपाली खन्ना (7219314433, 02132-223333), लोणावळा विभाग- नवनीत कुमार कावत (9560409479, 02114-273060)


 


            भरोसा सेल- कौटुंबिक हिंसाचाराशी निगडीत मदतीसाठी भरोसा सेल असून पुणे शहर- (020-26208341) आणि पिंपरी चिंचवड साठी (020-27352500) हे दूरध्‍वनी क्रमांक आहेत.


 


       महिलांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरते निवासस्थान आवश्यक असल्यास एक थांब केंद्र- सखी (वन स्‍टॉप सेंटर) स्‍थापन करण्‍यात आले आहे. एक थांब केंद्र -सखी, येरवडा- (9579635511) आणि एक थांब केंद्र- सखी, मुंढवा- (8275732421) यावर संपर्क साधून मदत घेता येऊ शकते. पुणे जिल्‍हा परिषदेचा टोल फ्री क्रमांक 18002334130 असा असून त्‍यावरही संपर्क साधून मदत मिळवता येवू शकते.


 


 


 


(राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे)


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
मा श्री. विनय सुदामपंत शेलुर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना कोविड १९ महायोद्धा 2020 (KOVID 19 WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Image
मा.श्री.शादाब मुलाणी युवासेना पुणे यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन