आरोग्यसेविकेनंतर तीन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह कर्जत आणि माथेरान शहरात आज 7 नवीन रुग्ण...


 


कर्जत,ता.29 गणेश पवार


 


                            27 मे प्रमाणे कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर कर्जत शहरात आज तीन तर माथेरान शहरात चार रुग्ण आढळून आले कर्जत तालुक्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 27 झाली आहे.दरम्यान,कर्जत आणि माथेरान शहरातील तब्बल तीन सरकारी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह असून त्यामुळे आरोग्य विभाग धास्तावला आहे.                


 


                              29 वर्षीय परिचारिका यांना कोरोना झाला होता.त्यांचे कोरोना टेस्ट चे अहवाल 27 मे रोजी आल्यानंतर त्याच दिवशी कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टर यांचे स्वाब कोरोना टेस्ट करण्यासाठी घेण्यात आले होते आणि त्यांच्या टेस्टचे अहवाल आले असून एक 49 वर्षीय पुरुष आणि 36 वर्षीय महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.त्या दोन्ही डॉक्टरांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सेवा बजावली होती आणि त्या दोन्ही डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांनी तपासणी केलेल्या सामान्य रुग्णांची यादी प्रशासन बनवत आहे.या दोन डॉक्टर यांच्याशिवाय 27 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या निवृत्त वन कर्मचारी यांचा 22 वर्षीय मुलगा त्यांच्या सतत संपर्कात राहिल्याने त्या 22 वर्षीय तरुणाचे कोरोना टेस्टचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.


 


                             


कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या आणि 


 


त्यांच्या मुलीच्या संपर्कात आलेल्या पंचशील नगरातील तिघांचे कोरोना टेस्ट चे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.त्यात 35 वर्षीय महिला,20 वर्षीय तरुणी आणि 28 वर्षीय तरुण यांचा समावेश आहे.त्यामुळे माथेरान आजच्या घडीला सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत.मात्र दुसरीकडे माथेरान नगरपरिषद रुग्णालयाचे डॉक्टर हे कोरोना पॉझिटिव्ह ठरले असून त्यांनी माथेरान मध्ये कोरोना रुग्ण आढळल्यानंतर गावात आरोग्य तपासणी अभियान राबविले होते,त्यामुळे त्यांनी तपासणी केलेल्या नागरिकांत घबराट पसरली आहे.कर्जत तालुक्यात आजच्या तारखेला कोरोना पॉझिटिव्ह 27 रुग्ण असून त्यातील चार बरे होऊन घरी परतले असून दोन मयत झाले आहेत.उर्वरित 21 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर वेगवेगळ्या कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पुणे प्रवाह न्युज पोर्टल