उमरोली मध्ये सदस्य भास्कर लोंगले यांच्या कडून 50 वृक्षांची लागवड

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 कर्जत,ता.26 गणेश पवार


                       कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतचे सदस्य भास्कर लोंगले यांनी गावाच्या परिसरात मोठ्या आकारातील 50 झाडांची लागवड केली. त्या झाडांचे संगोपन लोंगले करणार असून त्या सर्व झाडांना कुंपण घालण्यात देखील येत आहेत.


           उमरोली ग्राम पंचायत सदस्य भास्कर लोंगले यांनी पुढाकार घेऊन वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला होता. जांभुळ,आंबे,वड,निरगळी अशा प्रकारची 50रोपे यांची लागवड त्यांनी आपल्या मित्र परिवाराला सोबत घेऊन केली.त्यावेळी उमरोली ग्राम पंचायतच्या माजी सरपंच सौ.रुचिता लोंगले,उमरोली गावातील श्रीपती बाबा तरुण मंडळ अध्यक्ष विनोद लोंगले, पोलिस मिञ संघटना उपध्याक्ष ज्ञानेश्वर साळोखे,पोलीस मित्र संघटनेचे जिल्हा संघटक रायगड भुषण किशोर गायकवाड,तसेच अतिश हातनोलकर,नरेश रुठे,प्रथमेश लोंगले,मनोहर ठाणगे,समिर लोंगले,अभिजीत लोंगले, जयवंत तुपे,संदिप गायकर, जिग्नेश लोंगले,प्रतिक लोंगले,उपस्थित होते.