नेरळ पेट्रोलपंप जवळ दोन रिक्षांचा अपघात,नांगुर्ले येथील रिक्षाचालक जखमी.. बदलापूरच्या रिक्षामध्ये दारूच्या 16 बाटल्या

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


नेरळ पेट्रोलपंप जवळ दोन रिक्षांचा अपघात,नांगुर्ले येथील रिक्षाचालक जखमी..

बदलापूरच्या रिक्षामध्ये दारूच्या 16 बाटल्या

नेरळ,ता.7 गणेश पवार

             कर्जत-कल्याण रस्त्यावर नेरळ पेट्रोल पंप येथे अपघात झाला असून कर्जत कडून बदलापूर कडे जाणाऱ्या रिक्षा चालकाने कर्जत कडे जाणाऱ्या रिक्षाला धडक दिली .या अपघातात कर्जत नांगुर्ले येथील रिक्षाचालक जखमी झाला असून रिक्षाला धडक देणाऱ्या रिक्षा मध्ये दारूच्या 16 बाटल्या होत्या.दरम्यान,दारूची तस्करी केली जात असल्याचा संशयावरून रिक्षाचालक याला पोलिसांनी पकडून नेले आहे.

             7 मे रोजी सायंकाळी पाच च्या सुमारास कर्जत-कल्याण रस्त्यावर नेरळ पेट्रोल पंप येथे कर्जत कडे जाणाऱ्या रिक्षाला कल्याण कडे जाणाऱ्या रिक्षाने जोरदार धडक दिली.बदलापूर येथील रिक्षा चालक आपली एमएच 05-डीझेड 5102 ही रिक्षा कर्जत वरून कल्याण रस्त्याने बदलापूरकडे निघाली होती.त्यावेळी रिक्षामध्ये चालक आणि दोन असे तिघे जण होते आणि नेरळ पेट्रोल पंप येथे ज्यावेळी त्या रिक्षाने एमएच-46 बीडी 3023 या क्रमांकाच्या रिक्षाला धडक दिली,त्यावेळी हातात दारूच्या बाटल्या घेऊन दोन तरुण पळून गेले असे रिक्षाची धडक बसलेल्या कर्जत नांगुर्ले येथील रिक्षाचालक जयवंत बाळू पवार याने सांगितले.

             या अपघातात कर्जत नांगुर्ले येथील रिक्षाचालक जयवंत पवार यांना मोठी जखम झाली असून त्यांचा पाय मोडला आहे,नेरळ पोलिसांनी त्या रिक्षाचालक यास रायगड हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी पाठवले आहे.तर बेजबाबदारपणे रिक्षा चालवणाऱ्या बदलापूर येथील रिक्षाचालकास पकडून पोलीस ठाणे येथे नेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे बदलापूर येथील अपघात करणाऱ्या रिक्षामध्ये दारूच्या 16 बाटल्या पोलिसांना आढळल्या आहेत.तर जे दोन तरुण रिक्षा मधून उतरून पळून गेले आहेत,त्यांच्याकडे देखील दारूच्या बाटल्या होत्या असे जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे म्हणणे आहे.

 

Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा*                                        - उपमुख्यमंत्री अजित पवार   * पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
Image