देशातील ग्रामीण भागात 'ट्रेल'ला वाढता प्रतिसाद प्रादेशिक भाषेत आकर्षक व्हिडिओ तयार करण्यासाठी होतो वापर

 


पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 मुंबई, २९ मे २०२०: महामारीमुळे झालेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर, ऑनलाइन सामग्रीचा वापर विशेषत: ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाढला. नव्या काळातील व्हिड्युअल कंटेंटजनरेशन आणि शेअरिंग मंचामुळे या विकासाला अधिक चालना मिळाली. त्यापैकीच एक उदाहरण म्हणजे ट्रेल- एक अग्रेसर कम्युनिटी आधारीत प्लॅटफॉम, जे यूझरने निर्माण केलेल्या मूळ प्रादेशिक भाषेतील सामग्रीद्वारे जीवनशैलीचा शोध घेण्यास सक्षम करते. स्थापनेपासून हा मंच देशभरातील स्थानिकांच्या मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे.


व्हिडिओ ब्लॉगिंग मंच प्रत्येक महत्त्वाकांक्षी भारतीयाला त्यांच्या भाषिक पार्श्वभूमीकडे दुर्लक्ष करून अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देत समविचारी व्यक्तींना प्रासंगिक सामग्री शेअर करण्याची परवानगी देतो. त्यांच्या हक्कानुसार ते ‘की ओपिनिअन लीडर्स’ म्हणून उदयास येत आहेत. व्हिडिओ पाहणे तसेच प्रादेशिक भाषेत आकर्षक व्हिडिओ तयार करण्यासाठी हे लोक मोबाइल फोनचा वापर करतात. त्यामुळे या यूझर्सनी ट्रेलला त्यांच्या आवडता स्टोरीटेलिंग मंच म्हणून स्वीकारले आहे.


इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाने दर्शवलेल्या अहवालानुसार, ग्रामीण भाागात २२७ दशलक्ष अॅक्टिव्ह इंटरनेट यूझर्स आहेत. त्या तुलनेत मागील वर्षी शहरांमध्ये २०५ दशलक्ष अॅक्टिव्ह यूझर्स आहेत. त्यामुळे या स्थितीत अधिक आवश्यकता असलेल्या क्षेत्रात काम करण्याची ट्रेलची स्थिती होती. परिणामी, ट्रेलच्या मंचावर आता २ टीअर, ३ टीअर आणि ४ टीअर शहरांमधल ७८ टक्के ग्राहक आहेत.


ग्रामीण भागातील मागणी आणि पुरवठा साखळीनुसार, इंटरनेटचे प्रमाण ४० टक्के आहे. त्यामुळे ऑनलाइन कंटेंट इंडस्ट्रीला देशात प्रगती करण्यास भरपूर वाव आहे. आणि ट्रेल, हा अभिनव मूल्यांच्या आधारे, हा विकास साधण्यास कटिबद्ध आहे.