कापडी मास्क,पीपीई किट्स,sanitisers उपलब्ध करून देण्याचे मनपा आयुक्तांचे आवाहन,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीकरिता,
१७/०४/२०२०,


पुणे मनपास मदत स्वरूपात 
कापडी मास्क,पीपीई किट्स,sanitisers उपलब्ध करून देण्याचे मनपा आयुक्तांचे आवाहन,
कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधाकरिता पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या लढ्यात पुणेकर नागरिक,विविध संस्था, संघटना मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेल्या आहेत,
कोरोना विषाणू प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत,
ही लढाई यशस्वी करण्यासाठी व वाढत्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी दरम्यानच्या कालावधीत मा,महापौर मुरलीधर मोहोळ व महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी मनपास लढ्याकरीता वैद्यकीय साहित्य सामुग्री मदत स्वरूपात मिळणे करिता मनपाचे वतीने आवाहन केले होते,सदरच्या आवाहनास अनुसरून नागरिक,विविध संस्था,संघटना  यांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली,व करीत आहेत,याबाबत सर्व नागरिक,विविध संस्था,संघटना यांचे पुणे मनपाचे वतीने मनःपूर्वक आभार,
सद्धयस्थितीत वाढत्या कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे वाढती रुग्ण संख्येचा विचार करता सद्धयस्थितीत परिस्थितीवर प्रभावी नियंत्रणाच्या दृष्टीने मोठया प्रमाणावर कापडी मास्क,पीपीई किट्स,sanitisers,ची आवश्यकता आहे,
तरी कृपया पुणेकर नागरिक,विविध संस्था,संघटना  यांनी कृपया वरीलप्रमाणे वस्तू स्वरूपात मदत मिळणे करिता मा,महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जाहीर आवाहन केलेले आहे,
नागरिक,विविध संस्था संघटना,यांनी मदत देनेसंदर्भात  महानगरपालिकेतील मा,मनपा आयुक्त यांचे स्वीय सहायक,श्री,गजानन कडक,९६८९९३११०३,व इमेल आय डी- mco @punecorporation,org
या संकेत स्थळावर कृपया संपर्क साधावा,ही विनंती,


मनपास आज प्राप्त झालेली मदत खालील प्रमाणे-
-रोटरी क्लब,पुणे मिड टॉऊन,पुणे यांचे वतीने डायरेक्टर मिलिंद देशपांडे व अध्यक्ष सचिन देशपांडे यांनी ३००,पीपीई किट्स मा,महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांचेकडे सुपूर्त केले,याप्रसंगी मा,शैलेश टिळक,कुणाल टिळक,अतिरिक्त मनपा आयुक्त ( जनरल ) रुबल अगरवाल,आरोग्यप्रमुख डॉ,रामचंद्र हंकारे,डॉ,संजीव वावरे,व अन्य अधिकारी उपस्थित होते,
-पुणे पांजरपोल ट्रस्ट,
४३८ नरशी नाथा स्ट्रीट करीमजी,मुंबई,( रांका ) यांचेकडून-
पीपीई किट्स - ३००,
मास्क - ६५०,
Syanitiser-2000 bottles,
-डॉ, पल्लवी जैन,( MD,)
कृष्णा dygnostic,पुणे
यांचेकडून,
- ventilators - 20,
मास्क - २०००,
युवराज सासवडे,वोडाफोन्स आयडिया लि,यांचेकडून 
Sanitysers - 2000,bottles,
- रेहान शहीद,
लर्निंग लिंक फौंडेशन,दिल्ली,
यांचेकडून, sanitisers,-2000, bottles,
-चंद्रकांत गणेश गायकवाड,
उपअभियंता,बांधकाम परवाना विभाग,मनपा,यांचेकडून
रक्कम रुपये,- २१०००/-
- संजय गोविंदराव खाडे,
उपअधीक्षक,
उपायुक्त ( विशेष ) कार्यालय, मनपा,यांचेकडून रक्कम रुपये
११,१११/-
-संतोष किसनराव गायकवाड
कनिष्ठ अभियंता,बांधकाम परवाना विभाग,मनपा, यांचेकडून रक्कम रुपये,११,१११/-
-संजय मोरे,
माहिती व जनसम्पर्क अधिकारी,
पुणे महानगरपालिका,
१७/०४/२०२०,