अनॲकेडमी तर्फे पुण्यात अडकलेल्या एमपीएसची च्या विद्यार्थ्यांना मोफत  भोजनाची सोय

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


अनॲकेडमी तर्फे पुण्यात अडकलेल्या एमपीएसची च्या विद्यार्थ्यांना मोफत 


 


भोजनाची सोय


 


  कोविड १९ च्या साथीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना सहाय्य करण्यासाठी अनॲकेडमी ने केला एमपीएससी स्टुडंट्स राईट्स ग्रुप बरोबर सहकार्य करार  


 


अनॲकेडमी या भारतातील सर्वांत मोठ्या शैक्षणिक मंचा ने आज एमपीएससी स्टुडंट्स राईट्स ग्रुप बरोबर सहकार्य करार केल्याची घोषणा केली.  या कराराच्या माध्यमातून पुण्यात कोविड-१९ च्या साथीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना सहकार्य केले जाणार आहे.  या उपक्रमाचा एक भाग म्हणून अनॲकेडमी तर्फे शहरात शिक्षण घेत असलेल्या, घरापासून दूर असलेल्या आणि भोजन तयार करण्याच्या सामग्रीचा तुटवडा असलेल्या मुलांसाठी मोफत भोजनाची सोय करण्यात येत आहे. 


 


११ एप्रिल पासून अनॲकेडमी तर्फे दररोज किमान ४०० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून एमपीएससीच्या परिक्षांची तयारी करत असलेल्या १६०० हून अधिक विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे, जेणेकरून मुलांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये.


 


या उपक्रमा विषयी बोलतांना ‍बिझनेस ॲट अनॲकेडमी च्या उपाध्यक्षा अंकिता टंडन यांनी सांगितले “ अनअकॅडेमी मध्ये आम्ही नेहमी शिक्षण थांबू नये यावर अधिक भर देत असतो. विद्यार्थ्यांना अजोड असा शिक्षण मंच उपलब्ध करून देत असतांना आम्ही विद्यार्थ्यांना अशा साथीमुळे आलेल्या बाह्य समस्यां मध्ये सुध्दा सहकार्य करत असतो.  एमपीएससी स्टुडंट्स राईट्स ग्रुप बरोबरच्या या करारामुळे आता त्यांच्या परिवारापासून दूर असलेल्या ‍विद्यार्थ्यांना मोफत भोजन ‍मिळू शकेल. यामुळे त्यांना मदत तर होईलच पण त्याच बरोबर पोषक अन्न, आनंदी मन मिळाल्याने ते त्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकतील.”


 


अनॲकेडमी ने नुकतीच ‍विद्यार्थ्यांसाठी २० हजार मोफत लाईव्ह क्लासेसची घोषणा केली असून हा मंच शैक्षणिक  संस्थांसाठी खुला केला आहे, जेणेकरून शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना अजोड शिक्षण प्राप्त होऊ शकेल.