विप्रोचे संचालक अझीम प्रेमजी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या लौकीकाला साजेशी ११२५ कोटी मदत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


अखेर भारतातल्या सर्वात दानशूर व्यक्ती विप्रोचे संचालक अझीम प्रेमजी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या लौकीकाला साजेशी ११२५ कोटी देत असल्याची घोषणा केली. यांचा धर्म तोच आहे जो सध्या निझामुद्दीनमध्ये बदनाम होत आहे. फाळणीच्या वेळी अझीम प्रेमजीचे वडील प्रसिद्ध उद्योगपती आणि Rice king of Burma म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद हाशेम प्रेमजी यांना जिन्नाने पाकिस्तानला येण्याची विनंती केली होती. त्यांनी ती धुडकावून लावत भारताला निवडले आणि खूप बरे झाले जे असे वीर या भारतभूमीला मिळाले कारण आतापर्यंत भारतात १ लाख ४५ हजार करोड दान करून जगात तिसऱ्या क्रमांकावर आहेत आणि भारतातील सर्वात मोठा दानवीर व्यक्ती आहे. आतापर्यंत त्यांनी त्यांच्या संपत्तीच्या ३९ टक्के रक्कम दान करून टाकली आहे. खूप खूप धन्यवाद प्रेमजी, We love you lot! 😘