कोरोना नंतर सर्व सुट्ट्या रद्द करून अर्थव्यवस्था सुधारण्यास प्राधान्य द्यावे*                                              ---------------------------------------                                                                          *राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त चित्रपट निर्माते निलेश नवलखा यांचे आवाहन*            

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


Press note 
*कोरोना नंतर सर्व सुट्ट्या रद्द करून अर्थव्यवस्था सुधारण्यास प्राधान्य द्यावे*                                              ---------------------------------------                                                                          *राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त चित्रपट निर्माते निलेश नवलखा यांचे आवाहन*                                      --------------------------------- 
*सुट्टी घेणे हा आगामी काळात राष्ट्रद्रोह ठरेल :निलेश नवलखा* 


पुणे:


कोरोना विषाणू संसर्गाने भारतालाच नव्हे तर संपुर्ण जगाला जबरदस्तीची रजा घ्यावी लागली आहे, ह्या व्हायरस मुळे संपुर्ण जग जवळ जवळ पाॅज मोड वर थांबले आहे. या  गंभीर स्थितीत  आपण  संकटाचे संधी मधे रुपांतर करणे भारतासाठी अतिशय अनिवार्य आहे. कोरोना नंतर सर्व सुट्ट्या रद्द करून सर्वांनी अर्थव्यवस्था सुधारण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन शाळा ,फॅन्ड्री ,अनुमती, चौर्य, सिद्धांत, राक्षस अशासारख्या मराठी चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माते निलेश नवलखा यांनी केले आहे.


आज पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी हे आवाहन केले आहे.
आपण आधीच साधारण पणे महिनाभर सुट्टीत आहोत कदाचित अजुन महिनाभर किंवा कमी जास्त असेल, आणि लगेच ही परिस्थिती सुधारेल असं काही वाटत नाही, म्हणून  राज्य आणि केंद्र सरकारला विनंती आहे की येणार्या काळामधील भारतातल्या व महाराष्ट्रातल्या सर्व सार्वजनिक सुट्टया कोणत्याही संणांच्या,महापुरुषांच्या असोत ताबडतोब रद्द कराव्यात. 
राज्य सरकारला सर्वात मोठा महसूल हा एक्साईज आणि स्टॅम्प ड्यूटी मधुन येतो, ह्या पुढे त्यां विभागाच्या  सर्व सुंट्ट्या रद्द करणेत याव्यात. महाराष्ट्र आपल्याला आर्थिक दृष्ट्या मजबूत करायचा असेल आणि सरकारचे हात भक्कम करायचे असतील तर आपल्याला ही पावले उचलावीच लागतील,असे नवलखा यांनी म्हटले आहे.
२६ जानेवारी, १५ ॲागस्ट या राष्ट्रीय महत्वाच्या दिवशी  काम करणे बंधनकारक करावे, देशासाठी प्रत्येकाने काम करणे हीच राष्ट्रभक्ति आहे, सट्टी घेणे येणार्या काळात देशद्रोहच असणार आहे.
भारतात ३६५ दिवसांपैकी आपण साधारण अंदाजे २००-२२५ काम करतो, जपान, अमेरिका सारखे प्रगत देश सुमारे ३०० दिवस काम करतात, ह्यशिवाय दिवसातल्या आठ तासात सरकारी नोकरशाही साधारण ५ तास इफेक्टिव काम करते.


ह्या कठिण परिस्थिती च्या निमित्ताने सरकारने विषाणु ला रोखण्यासाठी तर काम केलेच पाहिजे परंतु हे संपल्यानंतर सुद्धा देश राहणार आहे .परंतु तो  प्रयत्नांनी पूर्ववत चांगल्या प्रकारे कसा करता येईल हा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे हे विसरुन चालणार नाही. 


‘माझं मत तुम्हाला पटत असेल तर आपण माझा विचार पुढे पाठवावा आणि तो पर्यंत पाठवत रहावा जो पर्यंत तो निर्णायक ठिकाणी पोहचत नाही ‘,असे निलेश नवलखा यांनी म्हटले आहे.हे आवाहन त्यांनी व्हाट्स अप अप द्वारे शक्य त्या सर्वाना आज पाठवले आहे.
------------------------------------