पत्रकार बंधू आणी भगिनी यांचे बाबत काही दुर्घटना घडल्यास त्यांना देखील  50 लाख ते 1 कोटी रुपयांचे विमा कवच मिळावे.... ऍड मंदारभाऊ जोशी 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


Kind ATTN 
Vvimp 
कृपया प्रसिद्धी साठी 


प्रति 
१)मा उद्धवजी ठाकरे 
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 
२)मा अजितदादा पवार 
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य


या पत्राद्वारे आपणाकडे मागणी करण्यात येत आहे की या गंभीर परिस्थिती मध्ये कोरोना विरुद्ध लढणाऱ्या
पोलीस आणी वैद्यकीय स्टाफ याना सरकारने विमा कवच दिलेले आहे ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. 
तसेच आजमितीला अनेक पत्रकार बंधू आणि भगिनी देखील सद्य परिस्थिती जनते पर्यंत पोहचावी या साठी जीवावर उदार होऊन या गंभीर परिस्थिती मध्ये देखील काम करीत आहेत 
सदर जनते प्रतिचे कर्तव्य पार पाडत असताना या वेळेस  पत्रकार बंधू आणी भगिनी यांचे बाबत काही दुर्घटना घडल्यास त्यांना देखील  50 लाख ते 1 कोटी रुपयांचे विमा कवच तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत चा आदेश आपले स्तरावरून त्वरित काढण्यात यावा ही विनंती ... 
ऍड मंदारभाऊ जोशी
राष्ट्रीय निमंत्रक 
आर पी आई (आठवले) 
कायदेशीर सल्लागार ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन
प्रत 
मा शरदचंद्रजी पवार 
खासदार राज्यसभा 
मा रामदासजी आठवले 
केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार