मोग्रज ग्रामपंचायत मधील 300 आदिवासी कुटुंबांना कर्जत शहरातील व्यापाऱ्यांकडून धान्य वाटप 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


मोग्रज ग्रामपंचायत मधील 300 आदिवासी कुटुंबांना कर्जत शहरातील व्यापाऱ्यांकडून धान्य वाटप 

कर्जत,ता.17 गणेश पवार

                              कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत आदिवासी बहुल ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायत मधील आदिवासी लोकांच्या घरची चूक गेली 21 दिवस दिवस सुरू असलेल्या लॉक डाऊन मुळे पेटू शकली नाही.ही बाब या ग्रामपंचायतच्या माध्यमातून कर्जत शहरातील व्यापारी यांच्या कानावर घालण्यात आली.दरम्यान,कर्जत शहरातील सहा व्यापाऱ्यांनी एकत्र येत मोग्रज ग्रामपंचायत मधील 300 गरजू कुटुंबांना धान्य वाटप केले.

                              कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने 22 मार्च पासून लोकांना घराच्या बाहेर पडणे बंद केले आहे.जनता कर्फ्यु नंतर 21 दिवसांला लॉक डाऊन सुरू असून हातावर कमवून पोट भरणारे लोक यांच्यावर या लॉक डाऊन मुळे उपासमारीची वेळ आली आहे.लॉक डाऊन मुळे निर्माण झालेली बेरोजगार आणि त्यामुळे निर्माण झालेली उपासमारी याबद्दल ग्रामस्थ ग्रामपंचायत मध्ये आपली कैफियत मांडत होते आणि ग्रामपंचायत मधील गावांची संख्या आणि लोकवस्ती लक्षात घेता तुटपुंजी आर्थिक उलाढाल असलेल्या मोग्रज ग्रामपंचायतच्या सरपंच रेखा रमेश देशमुख आणि उपसरपंच विलास भला यांनी कर्जत शहरातील काही दानशूर व्यापारी यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली.ही बाब लक्षात घेऊन कर्जत शहर बाजारपेठ मधील काही व्यापारी हे काही दिवसंपूर्वी मोग्रज ग्रामपंचायत मधील काही आदिवासी वाडीत जाऊन तेथील स्थितीची पाहणी केली.परिस्थिती बघून 50 आदिवासी लोकांना मदत करण्याची तयारी करणारे ते सहा व्यापारी यांचे मन हेलावले आणि त्यांनी 300 कुटुंबांना मदत करण्याचे ठरवले.

                               ही बाब लक्षात घेऊन कर्जत शहरातील व्यापारी यांनी एक रक्कम गोळा केली आणि त्यातून जीवनावश्यक वस्तू यांचे 300 किट बनवून मोग्रज येथे घेऊन गेले.रोनक ओसवाल,हितेश सोळंकी,मनोज ओसवाल,राजेंद्र मेडिकल,दिनेश ओसवाल,राकेश ओसवाल यांनी आपल्या मित्र परिवार यांच्यासह मोग्रज ग्रामपंचायत मधील मेचकरवाडी अ, मेचकरवाडी ब, चौधरवाडी, जाधव वाडी,मालेगाव,मालेगाव कातकरीवाडी या ठिकाणी जाऊन स्वतः धान्याचे किट यांचे वाटप केले.त्यावेळी ग्रामपंचायतच्या सरपंच रेखा देशमुख,कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळाजी पुरी,कर्जतचे नायब तहसीलदार संजय भालेराव,कर्जत तालुका आदिवासी संघटनेचे अध्यक्ष भरत शिद,यांचे हस्ते धान्य वाटप करण्यात आले.त्यावेळी उपसरपंच विलास भला,जेष्ठ नागरिक पुंडलिक देशमुख, ग्रामपंचायत सदस्य गणेश लडके,अशोक मेचकर, शंकर चौधरी,महेंद्र भोईर,रमेश मराडे,गणेश म्हसे यांच्यासह महसूल मंडळ अधिकारी गोरेगावकर,तलाठी संजय ठाकरे,गुरू मूर्ती,ग्रामविकास अधिकारी म्हात्रे,आदी प्रमुख उपस्थित होते.सर्व धान्याचे किट हे व्यापारी मंडळी यांनी आदिवासी वाडीमध्ये घरोघरी जाऊन वाटप केले.त्यामुळे त्यांच्या या दातृत्वाबद्दल आदिवासी लोकांनी त्यांचे कौतुक केले आहे