पुणे जिल्हयामधील कोरोना सांसर्गिक एकुण रुग्ण संख्या 194 झाली आहे. आतापर्यंत 29 रुग्णांना बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे. तसेच 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


विभागीय आयुक्त कार्यालय,पुणे


कोरोना विषाणूबाबत प्रेसनोट दि. 08/04/2020 (संध्या 4.00 वाजेपर्यंत)


1)     पुणे जिल्हयामधील कोरोना सांसर्गिक एकुण रुग्ण संख्या 194 झाली आहे. आतापर्यंत 29 रुग्णांना बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे. तसेच 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


    पुणे शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फ़त उपाययोजना करण्यात येत असून महानगरपालिका क्षेत्रातील काही भागात संचारबंदी जाहिर करण्यात आलेली आहे. तसेच पुणे महानगरपालिकेचे 25 दवाखाने सकाळी 8.00 वाजेपासून संध्याकाळी 8.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच नागरीकांसाठी पुणे महानगरपालिका व पुणे सिटी कनेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने , कनेक्टींग संस्थेच्या सहकार्याने कोरोनाविरुद्ध वस्ती मित्र हेल्पलाईन (मुख्यत्वे वस्त्यांमधील नागरीकांसाठी) क्र. 020-25506923 /24/25 अशी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 या वेळेमध्ये सुरू करण्यात आलेली आहे.   


2)     पुणे विभागातील कोरोना सांसर्गिक एकुण रुग्ण संख्या 229 झाली असून ती  जिल्हानिहाय पुणे 194  सातारा 6 सांगली 26 आणि कोल्हापूर 3 याप्रमाणे आहे. आतापर्यंत 33  रुग्णांना बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे. तसेच 16 रुग्णांचा मृत्यू झाला  आहे. आजपर्यंत विभागामधील 21,11,242 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 87,10,795 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 706  व्यक्तीना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.