जुगार खेळताना वाद,कर्जत मध्ये परस्पर विरोधी 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


जुगार खेळताना वाद,कर्जत मध्ये परस्पर विरोधी 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कर्जत,ता.13 गणेश पवार

                             कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत पत्ते खेळत असताना एकमेकांच्या मध्ये वाद झाल्याने वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.कर्जत पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.बंदी असलेला जुगार खेळत असल्याबद्दल आणि तेथे वाद करून मारहाण केल्याबद्दल 16 जणांवर गुन्हा दाखल झाले आहेत.

                               कर्जत पोलीस ठाण्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 11 एप्रिल रोजी कर्जत शहरातील आमराई भागातील गणपती मंदिराजवळ स्थानिक रहिवासी विजय जाधव, श्याम जाधव आणि सूरज जाधव हे पैसे लावून पत्ते खेळत होते.जुगार खेळत असताना त्यांच्यात वाद झाल्याने राजू राठोड हे भांडण सोडविण्याकरिता गेले.मात्र त्यांना व त्यांचे कुटुंबियांना विजय जाधव, श्याम जाधव, सूरज जाधव, गणेश जाधव, गौरव जाधव, सविता जाधव, ताई जाधव, दिया उत्तेकर यांनी मारहाण केली.राज्य सरकारकडून कोरोना च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असताना बेकायदेशिर एकत्र जमुन हातात दगड, काठया, तलवार घेऊन राजू राठोड तसेच त्यांची मुलगी आणि पुतणी यांना दुखापती करुन हाताबुक्याने मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत राजू राठोड यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार केली.तर याच हाणामारी प्रकरणी श्याम जाधव यांनी देखील कर्जत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली.त्या तक्रारीत राजू राठोड, विशाल राठोड, बाळा उर्फ जयेश राठोड, आशा राठोड, बेबी उर्फ शिल्पा राठोड, हेमा राठोड, निशा सोलंखी, राखी सोलंखी यांनी हाणामारी केली असल्याची तक्रार केली.

                                  याबाबत कर्जत पोलीस गुन्हा नोंद करण्यात आली असून पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून जुगार खेळणारे आणि मारहाण करणारे यांच्यावर भादवी कलम 188, 143,144,147,148,149, 337,324, 323, 504, 506, 427 आणि मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1),(3) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शना खाली या गुन्ह्यांचा तपास पोलीस हवालदार मेहबूब तांडेल हे करीत आहेत