“संस्थांनी आगामी काळाची पावले ओळखून त्याप्रमाणे विविध योजना आखण्यास सरकारी यंत्रणेस सहाय्य करावे”-मा.ना.नीलमताई गो-हे

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


) “मोठ मोठ्या स्वयंसेवी संस्था,शिक्षण संस्था,सहकारी संस्था आदीचे काम करीत असतांना फक्त राजकीय बाबीतच लक्ष देवू नये,कारण काहीवेळा केलेल्या अंदाजापेक्षा दुसराच निकाल येतो.एक तिकीट काढलेले मात्र गाडी भलत्याच ठिकाणी पोचते.सध्याची स्थिति पाहता हे सर्वांच्या लक्षात येत आहे.असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी केले. अॅक्शन फॉर अॅग्रिकल्चर रिन्युअल इन महाराष्ट्र (अफार्म) च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित “ग्रामीण विकासात स्वयंसेवी संस्थांची भूमिका” या विषयावर आयोजित राज्यस्तरीय परिषदेच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. “महाराष्ट्रातील विविध स्वयंसेवी संस्थानी शाश्वत विकासाचे कार्य हाती घेवून सरकार व सामान्य जनता यात दुवा झाले पाहिजे.कारण प्रशासन हे आपल्या पद्धतीने काम करते त्यांना प्रत्यक्षात त्या त्या परिस्थितीची पूर्ण माहिती नसते.यासाठी या संस्थांनी आगामी काळाची पावले ओळखून त्याप्रमाणे विविध योजना आखण्यास सरकारी यंत्रनेस सहाय्य करावे”. असे त्यांनी पुढे संगितले.


       या कार्यक्रमात सकाळच्या सत्रात स्मरनिकेचे प्रकाशन व संकेतस्थळाचे उद्घाटन मा.खा.शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.त्या प्रसंगी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,खा.श्रीनिवास पाटील उपस्थित होते.राजीव गांधी ई लर्निंग हायस्कूलच्या साहित्यसम्राट विजय तेंडुलकर सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी अफार्मचे अध्यक्ष प्रमोद देशमुख,कार्यकारी संचालक सुभाष तांबोळी,संचालिका वसुधा सरकार यांच्या बरोबरच राज्यभरातील विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते.  


छायाचित्र :परिषदेचा समारोप करताना मा.ना.नीलमताई गो-हे


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*